मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Zaman Khan : जमान खान मैदानावरच रडला, जिंकलेला सामना पाचव्या चेंडूमुळे गमावला

Zaman Khan : जमान खान मैदानावरच रडला, जिंकलेला सामना पाचव्या चेंडूमुळे गमावला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 15, 2023 02:34 PM IST

sri lanka vs pak zaman khan last over : अतिशय थरारक सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा शेवटच्या चेंडूवर पराभव केला. श्रीलंकेला शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज होती, जमान खान गोलंदाज होता, पण श्रीलंकेच्या असलंकाने या २ धावा सहज घेत संघाला विजय मिळवून दिला.

Zaman Khan last over vs sri lanka
Zaman Khan last over vs sri lanka (AFP)

Pakistan Vs Sri Lanka Last Over Highlights : आशिया कप २०२३ मध्ये (१४ सप्टेंबर) श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या सुपर 4 चा सामना खेळला गेला. या सामन्याला सेमी फायनलचे स्वरुप आले होते, कारण हा सामना जो जिंकेल तो, आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचणार होता. या सामन्यात श्रीलंकेने शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा पराभव केला आणि आशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारली.

ट्रेंडिंग न्यूज

जमान खानला हिरो बनण्याची संधी होती

हा सामना अतिशय रोमहर्षक झाला. शेवटच्या षटकात श्रीलंकेला ८ धावांची गरज होती. हे षटक करिअरचा पहिलाच सामना खेळणाऱ्या जमान खानने टाकले. जमान खान पाकव्याप्त काश्मीरचा रहिवासी आहे. जमान खानला पहिल्याच सामन्यात हिरो बनण्याची सुवर्णसंधी होती. पण जमान खानला ८ धावांचा बचाव करण्यात अपयश आले. त्याने शेवटच्या षटकात सुरेख गोलंदाजी केली, पण त्याला नशिबाची साथ मिळाली नाही. जमानने पहिल्या ४ चेंडू फक्त २ धावा दिल्या होत्या. मात्र, पाचव्या चेंडूवर एज लागून विकेटच्या मागे चौकार गेला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर चरिथ असलंकाने दोन धावा करून सामना खिशात घातला.

जमान खान रडला

पावसामुळे सामना ४२ षटकांचा करण्यात आला होता. हा सामना पावसामुळे मध्यरात्री उशीरापर्यंत चालला. अशा परिस्थितीतही कोलंबोचे आर प्रेमदासा स्टेडियम खचाखच भरलेले होते आणि विजयानंतर जल्लोषाने दुमदुमले होते.

दरम्यान, चरिथ असलंकाने शेवटच्या चेंडूवर विजयी धाव घेताच स्टेडिममध्ये जल्लोष सुरू झाला. खेळाडूंनी मैदानात येत असलंकाला मिठी मारत आनंद साजरा करायला सुरुवात केली. मात्र, पाकिस्तान संघात शोककळा पसरली होती. यावेळी आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या जमान खानला आपले अश्रू आवरता आले नाहीत. तो काही वेळ जमिनीवर डोके ठेवून बसलेला आणि

रडताना दिसला.

 

शेवटच्या षटकाचा थरार असा होता

पहिला चेंडू- प्रमोद मदुशन- १ धाव

दुसरा चेंडू – चरिथ असालंका – निर्धाव

तिसरा चेंडू- चरिथ असालंका- १ धाव

चौथा चेंडू- प्रमोद मदुशन- बाद

पाचवा चेंडू- चरिथ असालंका- चौकार

सहावा चेंडू- चरिथ असालंका- २ धावा

सामना कधी पाकिस्तान तर कधी श्रीलंकेच्या दिशेने

श्रीलंकेला शेवटच्या १५ षटकात विजयासाठी ९२ धावा. त्यानंतर शेवटच्या ५ षटकात ३३ धावा. तर शेवटच्या २ षटकात १२ धावांची गरज होती. अशा प्रकारे सामन्याचा कल प्रत्येक षटकानुसार बदलत राहिला.

४२ षटकांत २५२ धावांचे लक्ष्य

पावसामुळे सुपर फोर फेरीचा हा सामना दोन तास उशिराने सुरू झाला, त्यामुळे तो ४५ षटकांचा करण्यात आला. सामन्याच्या मध्यावर पुन्हा पाऊस पडला, त्यामुळे सामन्यातील षटकांची संख्या ४२ करण्यात आली. पाकिस्तानकडून यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने ७३ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधिक नाबाद ८६ धावा केल्या.

मेंडिस आणि अस्लंका विजयाचे हिरो

पाकिस्तानच्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने ८७ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकारासह ९१ धावा केल्या. तसेच, समरविक्रम (४८) आणि असलंकाने ४७ चेंडूत ३ चौकार आणि एक षटकारासह नाबाद ४९ धावा करत संघाला लक्ष्यापर्यंत नेले.

WhatsApp channel
Cricket News मधील सर्व ताज्या घडामोडी Live Score सह Marathi News आणि प्रत्येक सामन्यागणिक बदलणारा पाहा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर