आयपीएलच्या गेल्या मोसमात ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम लागू करण्यात आला होता. या निर्णयानंतर संघ सामन्यादरम्यान त्यांचा एक खेळाडू बदलू शकतात. पण आता या इम्पॅक्ट प्लेयर नियमावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
'इम्पॅक्ट प्लेयर' या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूची भूमिका कमी होत चालली आहे, असे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.
उदाहरणार्थ, चेन्नई सुपर किंग्सने शिवम दुबेचा फक्त पॉवर हिटर म्हणून वापर केला आहे, पण शिवम दुबे हा गोलंदाजीही करू शकतो. या अशा प्रकारामुळेच, आता भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानने याबाबत आपली भुमिका मांडली आहे.
जिओ सिनेमावर बोलताना झहीर खान म्हणाला की, मी पूर्णपणे सहमत आहे की हा वादाचा मुद्दा आहे, नक्कीच काही प्रमाणात चिंतेचा विषय आहे, परंतु आपल्याला याला सामोरे जाण्याचा मार्ग शोधावा लागेल'.
याशिवाय झहीर खानचा असा विश्वास आहे की इम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार केवळ तात्पुरते अष्टपैलू खेळाडू उपलब्ध असतील. इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे लंबी रेस के घोडे मिळणे अवघड आहे. तसेच झहीर खानने टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडिया कशी असेल, याबद्दलही आपले मत व्यक्त केले.
टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये जसप्रीत बुमराहसोबत मोहम्मद सिराज असायला हवा, असं तो म्हणाला. या दोन गोलंदाजांशिवाय अर्शदीप सिंगला टीम इंडियाचा भाग बनवायला हवे, असे मत झहीरने व्यक्त केले.
आजपासून जवळपास २ आठवड्यांनंतर टीम इंडियाची टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड होईल, असा विश्वास झहीर खानने व्यक्त केला आहे. बीसीसीआयचे निवडकर्ते अर्शदीप सिंगवर बारीक लक्ष ठेवून आहेत. या खेळाडूंव्यतिरिक्त खलील अहमद, मोहसीन खान आणि यश दयाल यांच्यावरही लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
T20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीवर आयोजित केला जाणार आहे. ही स्पर्धा २ जूनपासून सुरू होणार आहे.
संबंधित बातम्या