धनश्री वर्माला ४.७५ कोटी पोटगी देणार, युझी चहलची IPL मधील कमाई किती? २०१७ पर्यंत १० लाख पगार होता
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  धनश्री वर्माला ४.७५ कोटी पोटगी देणार, युझी चहलची IPL मधील कमाई किती? २०१७ पर्यंत १० लाख पगार होता

धनश्री वर्माला ४.७५ कोटी पोटगी देणार, युझी चहलची IPL मधील कमाई किती? २०१७ पर्यंत १० लाख पगार होता

Published Mar 20, 2025 08:19 PM IST

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma : युझवेंद्र चहल हा IPL मधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. चहलने त्याची पत्नी धनश्री वर्मापासून घटस्फोट घेतला आहे. धनश्रीला पोटगी म्हणून ४.७५ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. चहल २०११ पासून आयपीएलचा भाग आहे. आयपीएलमधून त्याने आतापर्यंत किती पैसे कमावले ते जाणून घेऊया.

धनश्री वर्माला ४.७५ कोटी पोटगी देणार, युझी चहलची IPL मधील कमाई किती? २०१७ पर्यंत १० लाख पगार होता
धनश्री वर्माला ४.७५ कोटी पोटगी देणार, युझी चहलची IPL मधील कमाई किती? २०१७ पर्यंत १० लाख पगार होता (dhanashree9/Instagram/FILE)

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma divorce news: युझवेंद्र चहल हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. सध्या लीगमध्ये त्याच्या नावावर २०० हून अधिक विकेट्स आहेत. सध्या चहल त्याच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत आहे. २०२० मध्ये चहलने कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्याशी लग्न केले होते.

त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. आता न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. धनश्रीला युझी चहल याच्याकडून ४.७५ कोटी रुपये पोटगी म्हणून मिळणार आहे.

IPL मधून चहलने किती कमाई केली?

युझवेंद्र चहल २०११ पासून आयपीएलचा भाग आहे. सुरुवातीला तो मुंबई इंडियन्समध्ये होता. २०११ ते २०१३ दरम्यान मुंबईकडून चहलला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. २०१४ च्या लिलावात त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विकत घेतले होते. तो २०२१ पर्यंत संघाचा भाग राहिला.

२०२२ च्या लिलावापूर्वी आरसीबीने युझी चहल याला रीलीज केले. आरसीबीने त्याच्यावर बोलीही लावली नाही. २०२२ ते २०२४ पर्यंत तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला. २०२५ च्या लिलावात पंजाब किंग्जने चहलला सर्वाधिक बोली लावून विकत घेतले.

१० लाखांचा युझी यहल १८ कोटींपर्यंत पोहोचला

मुंबई इंडियन्सने युजवेंद्र चहलला १० लाख रुपयांना करारबद्ध केले होते. यानंतर २०१४ मध्ये तो केवळ १० लाख रुपयांमध्ये आरसीबीमध्ये दाखल झाला. २०१७ च्या मोसमापर्यंत त्याला आयपीएल खेळण्यासाठी फक्त १० लाख रुपये मिळत होते. २०१८ च्या लिलावात त्याला विकत घेण्यासाठी आरसीबीला ६ कोटी रुपये खर्च केले होते.

२०२२ मध्ये राजस्थानने त्याला ६.५ कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले. आता टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतरही पंजाब किंग्जने IPL २०२५ च्या लिलावात चहलवर १८ कोटींची बोली लावली. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा फिरकी गोलंदाज ठरला.

६२.२ कोटींची कमाई केली

युजवेंद्र चहलने आतापर्यंत केवळ आयपीएल खेळून ६२.२ कोटी रुपये कमावले आहेत. आयपीएल रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर त्याने १६० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २०५ फलंदाजांना बाद केले आहे. चहलची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे ४० धावांत ५ बळी आहे. 

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या