Yuzvendra Chahal Dating History : भारताचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल सध्या तणावात आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांच्यात सर्व काही ठीक नाही, दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. चहलने धनश्री आणि त्याचे सर्व फोटो डिलीट केले आहेत.
दरम्यान, धनश्रीसोबत लग्न करण्यापूर्वी चहल आणखी एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. बॉलीवूड शादी डॉट कॉमनुसार, धनश्रीला डेट करण्याआधी काही वर्षे युजवेंद्र चहल तनिष्का कपूर नावाच्या एका बिझनेसवुमनला डेट करत होता. चहल हा तनिष्काच्या सोशल मीडिया पोस्टवर नियमितपणे कमेंट आणि लाईक करत होता. मात्र काही वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघेही वेगळे झाले.
काही वर्षांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत युजवेंद्र चहलने तनिष्कासोबतच्या नात्याच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. तो म्हणाला, की "मी गेल्या ४-५ महिन्यांपासून तनिष्का आणि माझ्या नात्याबद्दलच्या बातम्या वाचत आहे. मी अनेक लेखही वाचले आहेत पण सत्य हे आहे की तनिष्का आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा लोक सर्व प्रकारच्या गोष्टी बोलू लागतात. त्यांना वाटते की आम्ही डेटिंग करत आहोत."
दुसरीकडे, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा डिसेंबर २०२० मध्ये विवाहबद्ध झाले. पण त्यांच्या विभक्त होण्याची अफवा २०२२ मध्ये पहिल्यांदा आली जेव्हा धनश्री वर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून चहल हे आडनाव काढून टाकलेहोते. मात्र नंतर चहलने वेगळे होण्याच्या बातम्या फेटाळून लावल्या.
संबंधित बातम्या