Abhishek Sharma : सर अभिषेक शर्मा… टीम इंडियाची कामगिरी पाहून युवराज सिंग जाम खूश, हटके अंदाजात केलं कौतुक, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Abhishek Sharma : सर अभिषेक शर्मा… टीम इंडियाची कामगिरी पाहून युवराज सिंग जाम खूश, हटके अंदाजात केलं कौतुक, पाहा

Abhishek Sharma : सर अभिषेक शर्मा… टीम इंडियाची कामगिरी पाहून युवराज सिंग जाम खूश, हटके अंदाजात केलं कौतुक, पाहा

Jan 23, 2025 01:01 PM IST

Yuvraj Singh On Abhishek Sharma : कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने ७ गडी राखून विजय मिळवला. अभिषेक शर्माने संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.

Abhishek Sharma : सर अभिषेक शर्मा… टीम इंडियाची कामगिरी पाहून युवराज सिंग जाम खूश, हटके अंदाजात केलं कौतुक, पाहा
Abhishek Sharma : सर अभिषेक शर्मा… टीम इंडियाची कामगिरी पाहून युवराज सिंग जाम खूश, हटके अंदाजात केलं कौतुक, पाहा

India vs England 1st T20 : भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा याने इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात शानदार फलंदाजी करून टीम इंडियाला एकतर्फी विजय मिळवून दिला. अभिषेकच्या शानदार फलंदाजीवर टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि अभिषेकचा मेंटॉर युवराज सिंग खूपच खूश दिसत होता. युवीने अभिषेकचे खूप कौतुक केले.

अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाला स्फोटक सुरुवात करून दिली. डावखुरा अभिषेकने आक्रमक फलंदाजी करत ३४ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ७९ धावा केल्या. अभिषेकच्या फलंदाजीसमोर इंग्लिश गोलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होते.

अभिषेकची फलंदाजी पाहून युवराज सिंगने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, बॉईज मालिकेची चांगली सुरुवात! गोलंदाजांनी चांगला टोन सेट केला आणि सर अभिषेक शर्मा यांनी उत्कृष्ट खेळी खेळली. मी खूप प्रभावित झालो आहे.”

धावांचा पाठलाग करताना भारताने एकतर्फी विजय मिळवला

या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ २० षटकांत सर्वबाद १३२ धावांवर आटोपला. कर्णधार जोस बटलरने संघासाठी शानदार खेळी खेळली आणि ४४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. याशिवाय संघाच्या इतर कोणत्याही फलंदाजाला २०  धावांचा टप्पाही पार करता आला नाही. या काळात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने भारताकडून सर्वाधिक ३ बळी घेतले.

लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने अवघ्या १२.५ षटकांत तीन विकेट्स गमावून १३३ धावा करून विजय मिळवला. 

संघासाठी अभिषेक शर्माने २३२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत ७९ धावांची शानदार खेळी केली. याशिवाय संजू सॅमसनने २० चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २६ धावा केल्या. या काळात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने इंग्लंडकडून सर्वाधिक २ बळी घेतले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या