मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  आयसीसी टूर्नामेंटमध्ये टीम इंडिया सतत फ्लॉप का होते? युवीने सांगितला वर्ल्डकपचा जिंकण्याचा फॉर्म्युला

आयसीसी टूर्नामेंटमध्ये टीम इंडिया सतत फ्लॉप का होते? युवीने सांगितला वर्ल्डकपचा जिंकण्याचा फॉर्म्युला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 15, 2024 10:37 PM IST

Yuvraj Singh on Team India : टीम इंडिया अनेकवेळा आयसीसी टूर्नामेंटच्या फायनल आणि सेमीफायनलपर्यंत पोहोचली आहे. पण २०१३ पासून प्रत्येकवेळी भारत पराभूत झाला आहे. भारतीय संघाने २००७ च्या टी-20 विश्वचषकानंतर २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

Yuvraj Singh On Team India
Yuvraj Singh On Team India

टीम इंडियाने गेल्या काही वर्षात खूप चांगली कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी टीम इंडिया एकाचवेळी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वनवर देखील पोहोचली होती. भारतीय क्रिेकेट संघ बायलॅटरल सीरीजमध्ये खूप चांगली कामगिरी करते. 

पण टीम इंडिया मोठ्या स्पर्धांमध्ये फ्लॉप होते. खास करून आयसीसी स्पर्धा जिंकण्यात टीम इंडियाला अपयश येत आहे. गेल्या १० वर्षांत भारताला एकही आयसीसीची स्पर्धा जिंकता आलेली नाही. टीम इंडियाने शेवटच्या वेळी २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी एम एस धोनी भारताचा कर्णधार होता.

टीम इंडिया अनेकवेळा आयसीसी टूर्नामेंटच्या फायनल आणि सेमीफायनलपर्यंत पोहोचली आहे. पण २०१३ पासून प्रत्येकवेळी भारत पराभूत झाला आहे. भारतीय संघाने २००७ च्या टी-20 विश्वचषकानंतर  २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. 

युवीने सांगितला वर्ल्डकपचा जिंकण्याचा फॉर्म्युला

या विजयात टीम इंडियाचा अष्टपैलू युवराज सिंगचा महत्त्वाचा वाटा होता. आता अशातच युवराज सिंगने टीम इंडियाला आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा एक नवा फॉर्म्युला सांगितला आहे.

भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकायची असेल तर खेळाडूंना दडपण हाताळायला शिकावे लागेल, असे मत युवराज सिंगने व्यक्त केले आहे. मोठ्या स्पर्धांचे दडपण सहन करण्यात टीम इंडियाचे खेळाडू यशस्वी झाले, तर विजय मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. 

युवी म्हणाला की, ‘आपण तिन्ही फॉरमॅटमध्ये अनेक फायनल खेळलो, पण जिंकू शकलो नाही. ऑस्ट्रेलियाने ६ वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे, आपण २ वेळा जिंकलो आहोत. मोठ्या स्पर्धा कशा जिंकता येतील यावर काम करायला हवे. मोठ्या टूर्नामेंटसाठी आपण शारीरिकदृष्ट्या खूप मेहनत करतो, पण आपल्याला मानसिकदृष्ट्या काम करता येत नाही’.

खेळाडूंनी मानसिकदृष्ट्या तयार राहावे लागेल

युवराज सिंग पुढे म्हणाला की, आपल्या संघाला आयसीसी स्पर्धांसाठी मानसिकदृष्ट्या तयार राहावे लागेल. आपल्या संघात असे फलंदाज असावेत जे दबावाखाली खेळू शकतील, असे फक्त १-२ खेळाडू नाही तर संपूर्ण संघाला तयार राहावे लागेल. 

शारीरिक मेहनतीसोबतच खेळाडूंनी मानसिक दडपणावर काम करण्याची गरज आहे. युवी पुढे म्हणला की, माझी मुलं आता मोठी होत आहेत. माझी मुलं मोठी झाल्यानंतर मला कोचिंगची नोकरी करायची आहे, मी खेळाडूंना विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी मदत करेन'.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi