Yuvraj Singh News: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली खराब फॉर्ममध्ये आहेत. दोघेही सातत्याने अपयशी ठरत आहेत. घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांना काही खास कामगिरी करता आली नाही.ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत दोघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, या मालिकेतही ते अपयशी ठरले. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती जाहीर करावी, अशा मागणीने जोर धरला आहे. खराब फॉर्ममुळे रोहित आणि कोहली यांच्यावर होत असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने त्यांचे समर्थन केले.त्यांच्यावर टीका करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
युवराज सिंग म्हणाला की, विराट कोहली आणि रोहित शर्माने यापूर्वी मिळवलेले यश कोणीही विसरू नये. 'आम्ही विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या महान खेळाडूंबद्दल बोलत आहोत. काहीजण त्यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी भुतकाळात देशासाठी काय केले आहे, याचा लोकांना विसर पडत आहेत. ते सध्याच्या पिढीतील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, ते चांगले खेळू शकले नाहीत, याबाबत आपल्यापेक्षा त्यांनाच जास्त त्रास सहन करावा लागतो.असे युवराजने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
विराट आणि रोहित माझ्यासाठी कुटुंबातील सदस्यांसारखे आहेत आणि मला विश्वास आहे की, ते पुन्हा फॉर्ममध्ये येतील.संघ पुन्हा लय दाखवेल आणि रोहित आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर विश्वास असल्याचे युवराज सिंगने म्हटले. प्रशिक्षक गौतम गंभीर, अजित आगरकर, रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यानांच भारतीय क्रिकेटचे भवितव्य कसे पुढे जाईल हे ठरवावे लागले, असेही तो म्हणला.
युवराज सिंग म्हणाला की, 'रोहित शर्मा एक महान कर्णधार आहे. संघ जिंकला किंवा पराभूत झाला तरी तो एक महान कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळलो. आम्ही टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. आम्हाला खूप यश मिळाले आहे, आता टीका करणाऱ्यांनी संघाने केलेल्या कामगिरीच्या आकडेवारीवर नजर टाकावी', असा सल्ला युवीने दिला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या