भारतात लवकरच आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग (IML) ही क्रिकेट स्पर्धा सुरु होणार आहे. ही लीग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या क्रिकेटपटूंसाठी असणार आहे. या लीगच्या पहिल्या सीझनमध्ये सचिन तेंडुलकर याच्यासह अनेक दिग्गज खळाडू खेळताना दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट लीग २२ फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे.
IML मध्ये माजी क्रिकेटपटू ख्रिस गेल, मखाया एनटिनी आणि मॉन्टी पानेसर यांसारखे दिग्गज खेळणार आहेत. ख्रिस गेल, मखाया एन्टिनी आणि पानेसर अनुक्रमे वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे प्रतिनिधित्व करतील.
ही स्पर्धा २२ फेब्रुवारी ते १६ मार्च दरम्यान नवी मुंबई, राजकोट आणि रायपूर येथे होणार आहे.
"IML हे मोठे क्षण पुन्हा जिवंत करण्यासाठी आणि खेळातील काही सर्वोत्तम खेळाडूंसोबत स्टेज शेअर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे," असे ख्रिस गेलने म्हटले आहे.
तसेच, एनटिनी म्हणाला, की 'मी तुम्हाला खात्री देतो की हे पुनर्मिलन संस्मरणीय होणार आहे. आम्ही खेळणारे क्रिकेट कठीण आणि प्रेक्षणीय असेल. क्रिकेट चाहत्यांसाठी ही एक मेजवानी आहे.
भारताचा दिग्गज खेळाडू युवराज सिंग याने यापूर्वी स्पर्धेसाठी आपली उपलब्धता निश्चित केली होती. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड असे ६ संघ सहभागी होणार आहेत.
भारताचे आणखी काही मोठे खेळाडू या स्पर्धेसाठी त्यांची उपलब्धता दर्शवतील, अशी अपेक्षा आहे. जेणेकरुन चाहत्यांना त्यांचे जुने हिरो पुन्हा एकदा फील्ड ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील.
भारताचा महान दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय मास्टर लीगमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. नवी मुंबई व्यतिरिक्त राजकोट आणि रायपूर येथेही या स्पर्धेचे सामने होणार आहेत.
चाहते डिस्ने हॉटस्टारवर लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे मास्टर लीगचे सर्व सामने पाहू शकतील. हे सामने स्पोर्ट्स १८ वर टीव्हीवर प्रसारित केले जातील.
संबंधित बातम्या