Yuvraj Singh Biopic : युवराज सिंगवर बनतोय बायोपिक, कोण साकारणार 'सिक्सर किंग'ची भूमिका? जाणून घ्या-yuvraj singh biopic announced what we know about film based on cricket icon ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Yuvraj Singh Biopic : युवराज सिंगवर बनतोय बायोपिक, कोण साकारणार 'सिक्सर किंग'ची भूमिका? जाणून घ्या

Yuvraj Singh Biopic : युवराज सिंगवर बनतोय बायोपिक, कोण साकारणार 'सिक्सर किंग'ची भूमिका? जाणून घ्या

Aug 20, 2024 01:07 PM IST

माजी क्रिकेटर युवराज सिंग याच्या बायोपिकची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली आहे. हा बायोपिक टी-सीरीजच्या बॅनरखाली तयार होत आहे. तर भूषण कुमार आणि रवी भागचंदका निर्मिती करणार आहेत.

Yuvraj Singh Biopic : युवराज सिंगवर बनतोय बायोपिक, कोण साकारणार 'सिक्सर किंग'ची भूमिका? जाणून घ्या
Yuvraj Singh Biopic : युवराज सिंगवर बनतोय बायोपिक, कोण साकारणार 'सिक्सर किंग'ची भूमिका? जाणून घ्या

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरंतर आता युवराज सिंगचं आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली आहे. हा बायोपिक टी-सीरीजच्या बॅनरखाली तयार होत आहे. त्याचवेळी भूषण कुमार आणि रवी भागचंदका एकत्र या बायोपिकची निर्मिती करणार आहेत.

या बायोपिकच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहते विचारत आहेत की, क्रिकेटरची भूमिका कोण साकारणार? युवराज सिंगच्या भूमिकेत कोण दिसणार?

दरम्यान, या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता युवराजच्या भूमिकेत दिसणार आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही. मात्र, युवराज सिंगच्या बायोपिकसाठी टायगर श्रॉफ हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे सोशल मीडियावर अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे.

सिद्धांत चतुर्वेदीने बायोपिक करावा- युवराज

त्याचवेळी युवराज सिंग याने आपल्या मुलाखतीत म्हटले होते की, जर माझा बायोपिक बनत असेल तर त्यात सिद्धांत चतुर्वेदीने त्याची भूमिका साकारावी. वास्तविक, सिद्धांत चतुर्वेदीचा प्लस पॉइंट म्हणजे त्याचा लूक आणि शरीरयष्टी युवराज सिंग सारखीच आहे.

विशेष म्हणजे, याआधी सिद्धांत चतुर्वेदीने 'इनसाइड एज' या क्रिकेटवर आधारित वेब सीरिजमध्ये क्रिकेटरची भूमिका साकारली आहे.

दरम्यान आता, युवराज सिंग याची भूमिका साकारण्याची संधी कोणत्या अभिनेत्याला मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. युवराज सिंगने कॅन्सरशी झुंज देत २०११ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताला चॅम्पियन बनवले होते. तसेच कॅन्सरसारख्या आजारावर मात करून तो क्रिकेटच्या मैदानात परतला होता.

युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द

युवराज सिंगच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत भारतासाठी एकूण ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय आणि ५८ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग ६ चेंडूंवर ६ षटकार मारण्याचा विश्वविक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे. युवराजच्या खात्यात १९०० कसोटी, ८७०१ एकदिवसीय आणि ११७७ टी-20 आंतरराष्ट्रीय धावा आहेत.