गंभीरने शोधून काढला हिरा, बांगलादेश मालिकेत दिसणार जम्मू काश्मीरचा खेळाडू, १५० च्या स्पीडने चेंडू टाकतो-yudhvir singh selected as net bowler for team india in ind vs ban test series yudhvir singh stats career ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  गंभीरने शोधून काढला हिरा, बांगलादेश मालिकेत दिसणार जम्मू काश्मीरचा खेळाडू, १५० च्या स्पीडने चेंडू टाकतो

गंभीरने शोधून काढला हिरा, बांगलादेश मालिकेत दिसणार जम्मू काश्मीरचा खेळाडू, १५० च्या स्पीडने चेंडू टाकतो

Sep 09, 2024 01:51 PM IST

yudhvir singh : टीम इंडियाचा हेड कोच बनल्यानंतर गौतम गंभीरचा पहिला दौरा श्रीलंका दौरा होता, जिथे टीम इंडियाने टी-20 मालिका जिंकली. पण एकदिवसीय मालिका गमावली. आता मेन इन ब्लूची पुढील मालिका बांगलादेशविरुद्ध होणार आहे.

yudhvir singh : गंभीरने शोधून काढला हिरा, बांगलादेश मालिकेत दिसणार जम्मू काश्मीरचा खेळाडू, १५० च्या स्पीडने चेंडू टाकतो
yudhvir singh : गंभीरने शोधून काढला हिरा, बांगलादेश मालिकेत दिसणार जम्मू काश्मीरचा खेळाडू, १५० च्या स्पीडने चेंडू टाकतो

गौतम गंभीर याने टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून संघात अनेक बदल केले आहेत. तसेच, गंभीरने अनेक प्रकारचे एक्सपेरिमेंटही केले आहेत. वास्तविक, गंभीर कोच बनल्यानंतर चाहत्यांना त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. कारण त्याच्या कोचपदाच्या कार्यकाळात कोलकाता नाईट रायडर्सने २०२४ चे आयपीएल जेतेपद पटकावले होते.

टीम इंडियाचा हेड कोच बनल्यानंतर गौतम गंभीरचा पहिला दौरा श्रीलंका दौरा होता, जिथे टीम इंडियाने टी-20 मालिका जिंकली. पण एकदिवसीय मालिका गमावली. आता मेन इन ब्लूची पुढील मालिका बांगलादेशविरुद्ध होणार आहे.

बांगलादेशचा संघ २ कसोटी सामन्यांच्या आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. कसोटी मालिकेसाठी गौतम गंभीरने नवा अनकॅप्ड वेगवान गोलंदाज शोधला आहे, जो टीम इंडिया सोबत दिसणार आहे.

वास्तविक, गंभीरचा हा नवीन शोध म्हणजे लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज युधवीर सिंग आहे. एका रिपोर्टनुसार, युधवीर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत नेट बॉलर म्हणून टीम इंडियामध्ये सामील होईल.

१४५-१५० च्या स्पीडने गोलंदाजी करणारा युधवीर नेट प्रॅक्टिसमध्ये टीम इंडियासाठी महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. याशिवाय त्याला स्वत:ला सिद्ध करण्याचीही चांगली संधी मिळणार आहे.

तसेच, एका स्पोर्ट्स वेबसाईटच्या रिपोर्टमध्ये असेही सांगितले आहे की, "काल त्याला कॉल आला आणि त्याला १२ सप्टेंबर रोजी चेन्नईमध्ये रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले. ही त्याच्यासाठी खूप चांगली बातमी आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे."

युधवीर सिंग याने लखनौ सुपर जायंट्ससाठी आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. त्याला २०२३ मध्ये ३ आणि २०२४ मध्ये २ सामने खेळण्याची संधी मिळाली. युधवीरने लखनौसाठी ५ सामन्यात ४ विकेट घेतल्या. तो जम्मू-काश्मीरसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो.

२६ वर्षीय युधवीरने आतापर्यंत केवळ ४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने फलंदाजीत ७९ धावा केल्या आहेत. बाकी त्याने १२ लिस्ट ए आणि २० टी-20 सामने खेळले आहेत. त्याने लिस्ट ए मध्ये १२ आणि टी-20 सामन्यात १८ विकेट्स घेतल्या आहेत.

Whats_app_banner