मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ट्रॅव्हिस हेड ते कोहली… यंदा या १० फलंदाजांनी गाजवलं टेस्ट क्रिकेट, भारताचे किती फलंदाज? पाहा

ट्रॅव्हिस हेड ते कोहली… यंदा या १० फलंदाजांनी गाजवलं टेस्ट क्रिकेट, भारताचे किती फलंदाज? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 30, 2023 09:09 PM IST

virat kohli in 2023 : टेस्ट क्रिकेटमध्ये २०२३ या वर्षात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत उस्मान ख्वाजा पहिल्या स्थानावर आहे.

Most Runs In Test cricket 2023
Most Runs In Test cricket 2023

Most Runs In Test cricket 2023 : टीम इंडियासाठी २०२३ हे वर्ष चांगले राहिले आहे. यावर्षी टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वनवर राहिली. पण पण सोबतच रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने यावर्षी दोन आयसीसी ट्रॉफीच्या फायनल गमावल्या आहेत. भारताने WTC फायनल आणि वनडे वर्ल्डकपची फायनल गमावली आहे. या दोन्ही फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा धुव्वा उडवला.

टेस्ट क्रिकेटमध्ये २०२३ या वर्षात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत उस्मान ख्वाजा पहिल्या स्थानावर आहे. 

विशेष म्हणजे, यंदा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप ४ फलंदाज हे ऑस्ट्रेलियन आहेत. यावरून ऑस्ट्रेलियाचे यंदाचे टेस्ट क्रिकेटवरचे वर्चस्व दिसून येते.

ववव

सोबतच, कसोटी क्रिकेटमध्ये यंदा सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप १० फलंदाजांमध्ये विराट कोहली हा एकमेव भारतीय आहे. या वर्षी विराट कोहलीने ८ कसोटी सामन्यात ५५.९१ च्या सरासरीने ६७१ धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने १३ कसोटी सामन्यात ५२.६० च्या सरासरीने १२१० धावा केल्या आहेत. यानंतर स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्टीव्ह स्मिथने १३ कसोटी सामन्यात ४२.२२ च्या सरासरीने ९२९ धावा केल्या. 

या यादीत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड तिसऱ्या स्थानावर आहे. यावर्षी, टेस्ट फॉरमॅटमध्ये ट्रॅव्हिस हेडने ४१.७७ च्या सरासरीने ९१९ धावा केल्या. उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथने प्रत्येकी ३ शतके केली आहेत. तर ट्रॅव्हिस हेडने १ शतक झळकावले आहे. 

यानंतर मार्नस लॅबुशेन चौथ्या क्रमांकावर आहे. मार्नस लॅबुशेनने २०२३ मध्ये १३ कसोटी सामने खेळले यात त्याने ३४.९१ च्या सरासरीने ८०३ धावा केल्या.

२०२३ हे वर्ष या फलंदाजांनी गाजवलं

यानंतर इंग्लंडच्या जो रूटने ८ कसोटी सामन्यात ६५.५८ च्या सरासरीने ७८७ धावा केल्या. त्याच वेळी, जो रूटचा सहकारी हॅरी ब्रूकने ८ कसोटी सामन्यांमध्ये ५३.९२ च्या सरासरीने ७०१ धावा केल्या. 

विराट कोहली आठव्या क्रमांकावर

न्यूझीलंडच्या केन विल्यमसनच्या नावावर ७ कसोटी सामन्यांमध्ये ५५.९१ च्या सरासरीने ६९५ धावा आहेत. यानंतर भारताचा दिग्गज विराट कोहलीचा क्रमांक लागतो. विराट कोहलीने ८ कसोटी सामन्यात ५५.९१ च्या सरासरीने ६७१ धावा केल्या आहेत. कोहलीने कसोटीत यंदा दोन शतकं ठोकली आहेत.

इंग्लंडचा बेन डकेट आणि श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. बेन डकेटने ८ कसोटी सामन्यात ४६.७१ च्या सरासरीने ६५४ धावा केल्या. तर दिमुथ करुणारत्नेने ६ कसोटी सामन्यात ६०.८० च्या सरासरीने ६०८ धावा केल्या आहेत.

WhatsApp channel