मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Team India In 2023 : हरमनप्रीत आणि रोहित शर्माच्या टीम इंडियानं या वर्षात काय-काय जिंकलं? पाहा संपूर्ण यादी

Team India In 2023 : हरमनप्रीत आणि रोहित शर्माच्या टीम इंडियानं या वर्षात काय-काय जिंकलं? पाहा संपूर्ण यादी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 31, 2023 12:49 PM IST

Year Ender 2023 Team India : आयसीसी इव्हेंट्सच्या फायनलमध्ये पोहोचणे, हे देखील एक मोठी गोष्ट आहे. २०२३ या वर्षाला निरोप देताना महिला आणि पुरूष टीम इंडियाने या वर्षात काय कमावले याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

year ender 2023
year ender 2023

Indian Cricket Team In 2023 : टीम इंडियासाठी २०२३ हे वर्ष चांगले राहिले आहे. यावर्षी टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वनवर राहिली. पण पण सोबतच रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने यावर्षी दोन आयसीसी ट्रॉफीच्या फायनल गमावल्या आहेत. भारताने WTC फायनल आणि वनडे वर्ल्डकपची फायनल गमावली आहे. या दोन्ही फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा धुव्वा उडवला.

पण आयसीसी इव्हेंट्सच्या फायनलमध्ये पोहोचणे, हे देखील एक मोठी गोष्ट आहे. २०२३ या वर्षाला निरोप देताना महिला आणि पुरूष टीम इंडियाने या वर्षात काय कमावले याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

विशेष म्हणजे, भारतीय महिला संघ आणि पुरूष संघ या दोघांना या वर्षाच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. महिला संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात ३ धावांनी पराभव झाला. तर भारतीय पुरुष संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ३७ धावांनी पराभव झाला.

टीम इंडियासाठी २०२३ वर्ष खूप चांगले राहिले

दरम्यान, भारतीय पुरुष संघाने २०२३ या वर्षाची सुरुवात ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत करून केली होती. या कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली.

त्यानंतर भारताने वेस्ट इंडिज आणि आयर्लंडमध्ये चांगली कामगिरी केली. या दौऱ्यानंतर टीम इंडियाने वनडे आशिया कप २०२३ चे विजेतेपद पटकावले. सोबतच भारताच्या महिला आणि पुरुष संघाने चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीस टीम इंडियाने वर्ल्डकप २०२३ मधील सर्व साखळी सामने जिंकले आणि फायनलमध्ये प्रवेश केला. यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेत जाऊन वनडे मालिका जिंकली.

त्याचबरोबर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला क्रिकेट संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला कसोटीत पराभूत करून नवा इतिहास रचला. 

टीम इंडियानं या वर्षात काय कमावलं?

भारताने सलग तिसऱ्यांदा कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. भारताने या वर्षाच्या सुरुवातीला बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकली.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनचा उपविजेता ठरला.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वनडे आशिया कप २०२३ जिंकला.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने चीनमध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला टीम इंडियाने चीनमध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया वनडे वर्ल्डकप २०२३ चा उपविजेता ठरला.

भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने भारतात झालेल्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

यानंतर टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यावर गेली. या दौऱ्यात टीम इंडियाने टी-20 मालिका बरोबरीत राखली. तर वनडे मालिका जिंकली.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला टीम इंडियाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला एक सामन्याच्या कसोटी मालिकेत पराभूत केले.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi