भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळला जात आहे. आज (२४ नोव्हेंबर) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा नवा किंग यशस्वी जैस्वाल याने शतक झळकावले आहे.
ऑप्टस क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी शून्यावर बाद झाला होता. पण दुसऱ्या डावात त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. यशस्वी जैस्वालच्या कसोटी कारकिर्दीतील हे चौथे शतक आहे.
यशस्वी जैस्वालने षटकारासह आपले शतक पूर्ण केले. जोश हेझलवूडच्या बाउन्सरवर जैस्वाललने अप्परने कट केला आणि चेंडू थेट सीमा रेषेवरील दोरीवर पडला. यासह यशस्वीने ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिले शतक पूर्ण केले.
१०१- एमएल जयसिम्हा, ब्रिस्बेन, १९६८
११३ - सुनील गावस्कर, ब्रिस्बेन, १९७७
१०१* - यशस्वी जैस्वाल, पर्थ, २०२४
यशस्वी जैस्वाल त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखली जाते. पण या डावात तो तसा खेळला नाही. यशस्वीने २०५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्या आधी त्याने १२३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. यशस्वीने ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नॅथन लिऑनविरुद्ध १०० मीटर लांब षटकारही मारला.
या दरम्यान दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला पहिला धक्का केएल राहुलच्या रूपाने बसला. मिचेल स्टार्कने २०१/१ च्या स्कोअरवर टीम इंडियाला हा धक्का दिला. राहुलने ५ चौकारांच्या मदतीने १७६ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. आता देवदत्त पडिक्कल क्रीझवर आला आहे.