Yashasvi Jaiswal : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? ना रिप्लेत दिसलं ना स्निकोमीटरनं दाखवलं, तरी यशस्वी जैस्वालला आऊट दिलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Yashasvi Jaiswal : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? ना रिप्लेत दिसलं ना स्निकोमीटरनं दाखवलं, तरी यशस्वी जैस्वालला आऊट दिलं

Yashasvi Jaiswal : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? ना रिप्लेत दिसलं ना स्निकोमीटरनं दाखवलं, तरी यशस्वी जैस्वालला आऊट दिलं

Dec 30, 2024 11:51 AM IST

बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा युवा भारतीय फलंदाज यशस्वी जैस्वाल याला वादग्रस्त पद्धतीने आऊट देण्यात आले.

Yashasvi Jaiswal : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? ना रिप्लेत दिसलं ना स्निकोमीटरनं दाखवलं, तरी यशस्वी जैस्वालला आऊट दिलं
Yashasvi Jaiswal : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? ना रिप्लेत दिसलं ना स्निकोमीटरनं दाखवलं, तरी यशस्वी जैस्वालला आऊट दिलं

बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा युवा भारतीय फलंदाज यशस्वी जैस्वाल याला वादग्रस्त पद्धतीने आऊट देण्यात आले. ७१व्या षटकात पॅट कमिन्सच्या चेंडूवर जोरदार अपील झाले. अंपायरने नॉट आऊट दिले, पण यानंतर पॅट कमिन्सने डीआरएस घेतला.

बराच वेळ रिप्ले पाहिल्यानंतर थर्ड अंपायरने स्निकोमीटर तपासले. चेंडूचा कुठेही संपर्क झाला नसल्याचे स्पष्टपणे दिसत होते. पण तरी थर्ड अंपायरने जैस्वालला बाद घोषित केले.

यशस्वी जैस्वालला आऊट दिले

स्निकोमीटरवर कोणतीही हालचाल नसतानाही तिसऱ्या पंचाने यशस्वी जैस्वालला आऊट दिले. स्निकोमीटरवर काहीही न दिसल्यानंतर, अंपायरने पुन्हा एकदा रिप्ले तपासला.

आणि थर्ड अंपायर म्हणाले की, चेंडूची लाईन बदलली आहे. या कारणास्तव त्यांनी यशस्वी जैस्वाल याला बाद देण्याचा निर्णय घेतला.

थर्ड अंपायरने बाद देताच, यशस्वी जैस्वाल प्रचंड संतापला आणि त्याने मैदानावरील पंचांशी वाद घातला.

चेंडूने दिशा बदलली

समोरून रिप्ले पाहिल्यानंतर चेंडूची दिशा बदलल्याचे जाणवत होते. यामुळे तिसरे पंच शराफुद्दौला यांनी आऊट देण्याचा निर्णय घेतला. चेंडूने दिशा बदलल्याची पंचांना इतकी खात्री पटली की त्यांनी स्नीकोमीटरकडे दुर्लक्ष केले. जेव्हा बॅट कटसाठी रिव्ह्यू घेतला जातो तेव्हा स्निकोमीटरचा निर्णय अंतिम मानला जातो. मात्र, तिसऱ्या पंचाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे.

यशस्वी जैस्वालचे शतक हुकले

यशस्वी जैस्वाल पहिल्या डावातही शतक झळकावू शकला नाही. ८२ धावा करून त्याला धावबाद व्हावे लागले. या डावात त्याच्या बॅटमधून ८४ धावा आल्या. त्याने २०८ चेंडूत ८ चौकार मारले.

यावेळी वादग्रस्त निर्णयामुळे तो शतक झळकावण्यास मुकला. भारतासमोर विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य होते. यशस्वीशिवाय, अव्वल ७ फलंदाजांपैकी फक्त ऋषभ पंत भारतासाठी दुहेरी आकडा गाठू शकला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या