yashasvi jaiswal Travis Head catch : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज नागपूरात खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी तुफानी सरुवता केली आणि अवघ्या ८ षटकात ७५ धावांची सलामी दिली.
अशा स्थितीत इंग्लंड आरामात मोठी धावसंख्या गाठेल, असे वाटत असतानाच इंग्लंडसाठी एक दुर्वेवी घटना घटना घडली. त्यांचा स्फोटक सलामीवी फिल सॉल्ट धावबाद झाला. त्याने २६ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांच्या साह्याने ४६ धावा केल्या.
यानंतर पदार्पण करणाऱ्या हर्षित राणा याने एकाच षटकात दोन विकेट घेत इंग्लंडचा अडचणीत आणले.
९व्या षटकात पदार्पणचा सामना खेळणाऱ्या यशस्वी जैस्वालने बेन डकेट याचा अप्रतिम झेल घेतला. हर्षित राणाने बेन डकेट याला शॉर्ट चेंडू टाकला, यावर डकेटने हवेत फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटवर नीट बसला नाही आणि उंच उडाला.
यशस्वी जैस्वालने या संधीचे सोने केले आणि लांब धावत जाक झेल घेतला. या झेलमध्ये जैस्वालची मेहनत पाहण्यासारखी होती. हा विकेट गोलंदाजाचा नव्हता तर जैस्वाला होता. विशेष म्हणजे, यशस्वी जैस्वाल याचा हा झेल पाहून ट्रेव्हिस हेड याची आठवणी झाली. वनडे वर्ल्डकप २०२३ च्या फायनलमध्ये ट्रेव्हिस हेडने रोहित शर्माचा असाच झेल घेतला होता.
सॉल्ट-डकेट वेगाने धावा करत होते, पण दोघे बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या धावगतीला ब्रेक लागला.
यशस्वीच्या अप्रतिम झेलमुळे हर्षित राणाला ही विकेट मिळाली आणि त्यानंतर त्याचा उत्साह आणखीनच वाढला. त्याचा परिणाम पुढच्या २ चेंडूनंतरच दिसून आला. त्याच षटकात त्याने हॅरी ब्रूकची आणखी एक विकेट घेतली. म्हणजे नवोदित राणाने एकाच षटकात इंग्लंडचे दोन बळी घेतले. ब्रुक विकेटकीपर केएल राहुलच्या हाती झेलबाद झाला.
संबंधित बातम्या