मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Yashasvi Jaiswal : ब्रॅडमन, सचिन आणि कोहली... यशस्वी जैस्वालने अवघ्या ९ कसोटीत दिग्गजांचे विक्रम मोडले

Yashasvi Jaiswal : ब्रॅडमन, सचिन आणि कोहली... यशस्वी जैस्वालने अवघ्या ९ कसोटीत दिग्गजांचे विक्रम मोडले

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 08, 2024 11:28 AM IST

Yashasvi Jaiswal Records In Test Cricket : यशस्वी जैस्वाल हा इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने या मालिकेत आतापर्यंत ६८१ धावा केल्या आहेत.

Yashasvi Jaiswal : ब्रॅडमन, सचिन आणि कोहली... यशस्वी जैस्वालने अवघ्या ९ कसोटीत दिग्गजांचे विक्रम मोडले
Yashasvi Jaiswal : ब्रॅडमन, सचिन आणि कोहली... यशस्वी जैस्वालने अवघ्या ९ कसोटीत दिग्गजांचे विक्रम मोडले (ANI )

India Vs England 5th Test Dharamsala : भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरूवारपासून (७ मार्च) ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

भारताविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर आटोपला. भारताकडून कुलदीप यादवने ५ विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव सुरू आहे. भारताच्या पहिल्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी शानदार सुरुवात केली. या दरम्यान, यशस्वी जैस्वाल ५७ धावा करून बाद झाला. या ५७ धावांच्या खेळीत त्याने अनेक मोठे विक्रम केले आहेत. 

एका मालिकेत सर्वाधिक

यशस्वी जैस्वाल हा इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने या मालिकेत आतापर्यंत ६८१ धावा केल्या आहेत. त्याने याबाबतीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने ६५५ धावा केल्या होत्या. याशिवाय यशस्वी जैस्वालने कसोटी फॉरमॅटमध्ये १ हजार धावांचा आकडाही गाठला आहे.

यशस्वी जैस्वालने १६ डावात १००० धावांचा टप्पा गाठला. मात्र, भारतासाठी सर्वात कमी कसोटी डावात १००० धावा करण्याचा विक्रम विनोद कांबळीच्या नावावर आहे. त्याने १४ डावात ही कामगिरी केली होती. 

एका मालिकेत सर्वाधिक षटकार

याशिवाय यशस्वी जैस्वाल हा कोणत्याही एका देशाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत या फलंदाजाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या ९ डावात २६ षटकार ठोकले आहेत. याबाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. मास्टर ब्लास्टरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका कसोटी मालिकेत २५ षटकार मारले होते.

भारताचा ब्रॅडमन

सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये १००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी जैस्वाल पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत डॉन ब्रॅडमन पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी ७ कसोटी सामन्यांमध्ये १००० धावा पूर्ण केल्या होत्या. तर यशस्वी जैस्वालने ९ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.

मात्र, डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर यशस्वी जैस्वालसोबत ३ फलंदाजांनी ९ सामन्यात एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. याशिवाय यशस्वी जैस्वाल कसोटी सामन्यात १००० धावा करणाऱ्या सर्वात तरुण फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आला आहे. यशस्वी जैस्वालने २२ वर्षे १९७ दिवसांत ही कामगिरी केली. तर सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. मास्टर ब्लास्टरने १९ वर्षे २१७ दिवसांत कसोटीत एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

कसोटीत ७१.४३ च्या सरासरीने १००० धावा पूर्ण

यशस्वी जैस्वालने कसोटी सामन्यात ७१.४३ च्या सरासरीने १००० धावा पूर्ण केल्या आहेत. भारतासाठी सर्वोत्तम सरासरीने १००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी जैस्वाल तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत विनोद कांबळी पहिल्या क्रमांकावर आहे. कांबळीने ८३.३३ च्या सरासरीने १००० कसोटी धावा केल्या होत्या. तर चेतेश्वर पुजारा आणि यशस्वी जैस्वाल यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत ७१.४३ च्या सरासरीने १००० धावा पूर्ण केल्या.

WhatsApp channel