Yashasvi Jaiswal, IND vs AFG 1st T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
रोहित शर्माने पहिल्या सामन्यात संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही. जैस्वालला दुखापतीमुळे पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जैस्वाल याच्याबाबत अपडेट दिले आहे.
जैस्वालबद्दल अपडेट देताना बीसीसीआयने सांगितले की, "यशस्वी जैस्वाल उजव्या मांडीच्या दुखण्यामुळे पहिल्या T20 मध्ये निवडीसाठी उपलब्ध नव्हता."
जैस्वाल यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग होता. त्याने दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली होती. या दौऱ्याची सुरुवात T20 मालिकेने झाली आणि त्यातही जैस्वाल भारतीय संघाचा भाग होता.
अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार