मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने केली विराट कोहलीची बरोबरी, आता पुढच्या कसोटीत विक्रम मोडणार

Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने केली विराट कोहलीची बरोबरी, आता पुढच्या कसोटीत विक्रम मोडणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 26, 2024 06:03 PM IST

Yashasvi Jaiswal England test series : टीम इंडियाचा उदयोन्मुख फलंदाज यशस्वी जैस्वालने विराट कोहलीच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. यशस्वीने ४ सामन्यांच्या ८ डावात ६५५ धावा केल्या आहेत.

Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswal

टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन यशस्वी जैस्वाल सध्या इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये आपल्या बॅटने चांगलाच धुमाकूळ घालत आहे. यशस्वीने ४ कसोटी सामन्यांच्या ८ डावात दोन द्विशतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत.

यासह त्याने इंग्लंडविरुद्धच्या एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीची बरोबरी केली आहे. अशा स्थितीत तो पाचव्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या पुढे जाऊ शकतो.

यशस्वीने विराटच्या विक्रमाची बरोबरी केली

भारतीय क्रिकेट संघाचा उदयोन्मुख सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात विराट कोहलीच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. यशस्वीने ४ सामन्यांच्या ८ डावात ६५५ धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. यशस्वीने या काळात दोन द्विशतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत.

यशस्वीच्या आधी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही इंग्लंडविरुद्धच्या कसोटी एका मालिकेत ६५५ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने २०१६ मध्ये भारतीय भूमीवर इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली होती.

राहुल द्रविडने ६०२ धावा केल्या होत्या

भारतीय मैदानांवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत राहुल द्रविड आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. राहुल द्रविडने २००२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ६०२धावा केल्या होत्या.

चौथ्या नंबरवर पुन्हा विराट

२०१८ मध्ये जेव्हा इंग्लंडचा संघ भारतीय दौऱ्यावर आला होता, तेव्हा विराट कोहलीने त्या कसोटी मालिकेत ५९८ धावा केल्या. अशाप्रकारे विराट कोहलीने दोनदा इंग्लंडविरुद्ध एका मालिकेत ५ हून अधिका केल्या आहेत.

विजय मांजरेकर पाचव्या स्थानावर 

माजी क्रिकेटपटू विजय मांजरेकर भारतीय भूमीवर इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहेत. विजय मांजरेकर यांनी १९६१ मध्ये टीम इंडियासाठी ५८६ धावा केल्या होत्या.

IPL_Entry_Point