Yashasvi Jaiswal Out Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ११ फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी टीम इंडियाचा अंतिम १५ सदस्यीय संघ जाहीर केला. अंतिम संघात दोन मोठे बदल पाहायला मिळाले. पहिला बदल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या रूपाने दिसून आला.
बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आणि त्याच्या जागी हर्षित राणाला संघाचा भाग बनवण्यात आले. दुसरा बदल डावखुरा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालच्या रुपात झाला. जैस्वालला संघातून वगळून करण्यात आले.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला आहे, पण जैस्वाल पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामनाही खेळला होता. असे असूनही, त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या १५ सदस्यीय संघातून वगळण्यात आले आणि नॉन ट्रॅव्हलिंग रिझर्व म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले.
जैस्वाल याच्याबाबत बीसीसीआयने सांगितले की, त्याच्या जागी फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचा संघात समावेश करण्यात आला आहे. वरुण इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही टीम इंडियाचा भाग आहे.
यशस्वी जैस्वाल याला संघातून वगळल्यानंतर चाहते गप्प बसले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जैस्वालला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियातून का वगळण्यात आले, असा सवाल उपस्थित केला आहे. सोबतच अनेकांनी याबाबत संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना जबाबदार धरले असून त्यांना प्रचंड ट्रोल केले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
संबंधित बातम्या