Yashasvi Jaiswal India vs England ODI Squad : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा ३-१ असा पराभव झाला. पण यशस्वी जैस्वालसाठी ही मालिका खूप चांगली ठरली. या मालिकेत तो टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर त्याने एकूण ३९१ धावा केल्या आणि मालिकेतील पहिल्या कसोटीत १६१ धावांची खेळी खेळली.
आता एका मीडिया रिपोर्टमधून समोर आले आहे की, कसोटी मालिकेतील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी निवडकर्ते जैस्वालला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय संघात आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळण्याची संधी देऊ शकतात.
रेव्ह स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, यशस्वी जैस्वाल इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियासाठी सलामीला खेळताना दिसू शकते. जैस्वालने कसोटी आणि टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे, परंतु आतापर्यंत त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण केलेले नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवेल. जैस्वाल याला बॅकअप ओपनर म्हणून टीम इंडियामध्ये ठेवण्यात येईल. तर शुभमन गिल रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करणार आहे.
विराट कोहली आणि श्रेयस अय्यर अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात. केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यात यष्टिरक्षकाची भूमिका मिळविण्यासाठी स्पर्धा आहे, तर अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे दोघे मिळून फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळू शकतात. वॉशिंग्टन सुंदरलाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
हार्दिक पांड्या देखील एकदिवसीय संघाचा भाग असेल, परंतु नितीश कुमार रेड्डीला स्थान मिळेल की नाही. याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. २०२४ मध्ये ७ टी-20 सामन्यांत १७ बळी घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीवरही निवड समिती लक्ष ठेवून आहे. मात्र ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये त्याला स्थान मिळण्याबाबत साशंकता आहे.
संबंधित बातम्या