मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Eng Test : आधी चौकार खाल्ला… पण त्याच षटकात जैस्वालची विकेट काढली, जो रूटने दाखवली फिरकीची जादू

Ind vs Eng Test : आधी चौकार खाल्ला… पण त्याच षटकात जैस्वालची विकेट काढली, जो रूटने दाखवली फिरकीची जादू

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 26, 2024 11:03 AM IST

Yashasvi Jaiswal Hyderabad Test : पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जो रूट इंग्लंडसाठी पहिले षटक टाकत होता. तर फॉर्मात असलेला जैस्वाल स्ट्राइकवर होता.

Ind vs Eng Hyderabad Test
Ind vs Eng Hyderabad Test

Ind vs Eng Hyderabad Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. आज (२६ जानेवारी) सामन्याचा दुसरा असून टीम इंडिया फलंदाजी करत आहे.

दरम्यान, कालचे नाबाद फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी आज खेळायला सुरुवात केली. पण शानदार फॉर्मात असलेला यशस्वी जैस्वाल याला आज खास काही करता आले नाही, त्याला जो रूटने आपल्या फिरकीत अडकवले आणि बाद केले.

त्याआधी पहिल्या दिवशी (२५ जानेवारी) जैस्वाल ७० चेंडूंत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या होत्या. यशस्वीने दुसऱ्या दिवसाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने चौकार लगावला. मात्र, यानंतर इंग्लंडचा अनुभवी खेळाडू जो रूटने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले.

वास्तविक, पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जो रूट इंग्लंडसाठी पहिले षटक टाकत होता. तर फॉर्मात असलेला जैस्वाल स्ट्राइकवर होता. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जैस्वालने चौकार मारला. मात्र, यानंतर जो रुटने ते करून दाखवले जे आतापर्यंत या सामन्यात इतर कोणताही इंग्लिश गोलंदाज करू शकला नव्हता. रूटने जैस्वालला आपल्या जाळ्यात अडकवले.

ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर जैस्वालला ड्राईव्ह मारून आणखी एक चौकार वसूल करायचा होता. पण रूटने चेंडू हवेत आणि बराच स्लो टाकला. यामुळे जैस्वालची टायमिंग चुकली आणि चेंडू हवेत गेला. यानंतर रूटने अप्रतिम झेल घेतला आणि दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात जैस्वालची शानदार खेळी संपुष्टात आणली. जैस्वाल ८० धावा करून बाद झाला.

तत्पूर्वी, या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा संघ २४६ धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघ फलंदाजी करत असून कसोटीवर मजबूत पकड निर्माण केली आहे.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi