Yashasvi Jaiswal : सचिन-विराट करू शकले नाहीत, ते यशस्वी जैस्वालनं केलं, पुणे कसोटीत इतिहास घडला, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Yashasvi Jaiswal : सचिन-विराट करू शकले नाहीत, ते यशस्वी जैस्वालनं केलं, पुणे कसोटीत इतिहास घडला, पाहा

Yashasvi Jaiswal : सचिन-विराट करू शकले नाहीत, ते यशस्वी जैस्वालनं केलं, पुणे कसोटीत इतिहास घडला, पाहा

Updated Oct 26, 2024 12:39 PM IST

Ind vs Nz Pune Test Day 3 : टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने मोठा विक्रम केला आहे. यशस्वी जैस्वालने एका कॅलेंडर वर्षात कसोटी फॉरमॅटमध्ये त्याच्या १००० धावा पूर्ण केल्या आहेत.

Yashasvi Jaiswal : सचिन-विराट करू शकले नाहीत, ते यशस्वी जैस्वालनं केलं, पुणे कसोटीत इतिहास घडला, पाहा
Yashasvi Jaiswal : सचिन-विराट करू शकले नाहीत, ते यशस्वी जैस्वालनं केलं, पुणे कसोटीत इतिहास घडला, पाहा (AP)

भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल याने एक मोठा विक्रम केला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यशस्वीने हा पराक्रम केला. विशेष म्हणजे, दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनाही त्यांच्या कारकिर्दीत अशी कामगिरी करू शकले नाहीत. 

यशस्वी जैस्वालने चालू कॅलेंडर वर्षात कसोटी फॉरमॅटमध्ये त्याच्या १००० धावा पूर्ण केल्या आहेत.  यशस्वीने १००० धावा पूर्ण करून मोठा विक्रम केला. खरं तर, वयाच्या २३ वर्षापूर्वीच एका कॅलेंडर वर्षात १००० किंवा त्याहून अधिक कसोटी धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की महान सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर देखील ही कामगिरी करू शकले नाहीत. सध्याचे महान भारतीय रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही ही कामगिरी करता आली नाही.

एका कॅलेंडर वर्षात १ हजार धावा करणारे फलंदाज

११९३ - गारफिल्ड सोबर्स (१९५८)

११९८ - ग्रॅम स्मिथ (२००३)

१००८ - एबी डिव्हिलियर्स (२००५)

१०१३ - ॲलिस्टर कुक (२००६)

१०७०* - यशस्वी जैस्वाल (२०२४)

जैस्वाल सर्वात युवा फलंदाज ठरला

एका कॅलेंडर वर्षात १००० कसोटी धावा करणारा यशस्वी हा सर्वात युवा भारतीय ठरला. या २२ वर्षीय फलंदाजाने दिलीप वेंगसरकर यांना मागे टाकले. वेंगसरकर यांनी १९७९ मध्ये वयाच्या २३व्या वर्षी १००० धावा केल्या होत्या.

सध्या, जैस्वाल २०२४ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्यांच्या यादीत इंग्लंडच्या जो रूटच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने १४ सामन्यांमध्ये १३०५ धावा केल्या आहेत. या वर्षी जैस्वालने केवळ १० सामन्यांमध्ये १०७० हून धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे.

यशस्वी जैस्वाल वयाच्या २३ वर्षापूर्वी एका कॅलेंडर वर्षात १०००+ कसोटी धावा पूर्ण करणारा जगातील फक्त पाचवा फलंदाज ठरला आहे. गारफिल्ड सोबर्स यांनी हा पराक्रम पहिल्यांदा १८५८ मध्ये केला होता.

२००३ मध्ये, ग्रॅम स्मिथ अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला. त्यानंतर २००५ मध्ये एबी डिव्हिलियर्सने ही कामगिरी केली. ॲलिस्टर कूक २००६ मध्ये या क्लबमध्ये सामील झाला आणि आता यशस्वी जैस्वालनेही तशीच कामगिरी केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या