Yashasvi Jaiswal Double Century : यशस्वी जैस्वालचं धमाकेदार द्विशतक, दिग्गज फलंदाजांच्या या खास क्लबमध्ये एन्ट्री
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Yashasvi Jaiswal Double Century : यशस्वी जैस्वालचं धमाकेदार द्विशतक, दिग्गज फलंदाजांच्या या खास क्लबमध्ये एन्ट्री

Yashasvi Jaiswal Double Century : यशस्वी जैस्वालचं धमाकेदार द्विशतक, दिग्गज फलंदाजांच्या या खास क्लबमध्ये एन्ट्री

Published Feb 03, 2024 10:29 AM IST

Yashasvi Jaiswal Double Century : भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्ध दमदार फलंदाजी करताना द्विशतक झळकावले आहे. त्याने विशाखापट्टणम येथे दुसऱ्या दिवशी २७७ चेंडूत १८ चौकार आणि ७ षटकार मारून कारकिर्दीतील पहिले द्विशतक पूर्ण केले.

Yashasvi Jaiswal Double Century
Yashasvi Jaiswal Double Century (REUTERS)

India vs England 2nd Test Day 2, Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. आज (३ फेब्रुवारी) सामन्याचा दुसरा दिवस आहे.

आज सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने आपले द्विशतक पूर्ण केले आहे. जैस्वालने २७७ चेंडूत चौकार मारून आपले द्विशतक पूर्ण केले. याआधी त्याने षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले होते. कसोटीत द्विशतक करणारा तो तिसरा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला आहे.

कसोटीत द्विशतक करणारे युवा भारतीय

विनोद कांबळी- २२४ धावा वि. इंग्लंड १९९३ (२१ वर्षे ३५ दिवस)

विनोद कांबळी- २२७ धावा वि. झिम्बाब्वे, १९९३ (२१ वर्षे ५५ दिवस)

सुनील गावस्कर- २२० धावा वि.वेस्ट इंडिज १९७१ (२१ वर्षे २८३ दिवस)

यशस्वी जैस्वाल- २०९ वि. इंग्लंड २०२४ (२२ वर्षे ३७ दिवस)

यशस्वी जैस्वाल २०९ धावा करून बाद

यशस्वी जैस्वाल द्विशतक झळकावल्यानंतर काही वेळातच २०९ धावांवर जेम्स अँडरसनचा बळी ठरली. अँडरसनला षटकार मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. जॉनी बेयरस्टॉने त्याचा झेल टिपला. यशस्वी जैस्वालने २९० चेंडूत २०९ धावांची शानदार खेळी केली. त्याने १९ चौकार आणि ७ षटकार ठोकले.

हे वृत्त लिहिपर्यंत भारताच्या ८ बाद ३८७  धावा झाल्या असून कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह क्रीजवर आहेत.

तत्पूर्वी, कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने ६ गडी गमावून ३३६ धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल १७९ धावा करून तर रविचंद्रन अश्विन ५ धावांवर नाबाद होते, दोघांनी आज या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. आज अश्विन लवकर बाद झाला. त्याला २० धावांवर अँडरसने विकेटकीपर बेन फोक्सकरवी झेलबाद केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या