Video : हारेंगे पर सीख के जाएंगे... वर्ल्डकप गेला पण नमन तिवारीनं भारतीयांची मनं जिंकली
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Video : हारेंगे पर सीख के जाएंगे... वर्ल्डकप गेला पण नमन तिवारीनं भारतीयांची मनं जिंकली

Video : हारेंगे पर सीख के जाएंगे... वर्ल्डकप गेला पण नमन तिवारीनं भारतीयांची मनं जिंकली

Feb 12, 2024 11:25 AM IST

Under 19 World Cup Final : सामन्यादरम्यानचा एका भारतीय खेळाडूचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओती संवाद ऐकून भारतीय चाहत्यांचा उर भरून आला आहे.

murugan abhishek and naman tiwari yaad rakh haarenge par sikj ke jayenge
murugan abhishek and naman tiwari yaad rakh haarenge par sikj ke jayenge (AFP)

India U19 vs Australia U19 Final : अंडर-१९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये (११ फेब्रुवारी) टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. यासह वर्षभरात आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे भारताचे आणखी एक स्वप्न भंगले.

अंडर १९ वर्ल्डकप २०२४ च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा ७९ धावांनी पराभव केला. या सह टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाली आहे.

गेल्या ८ महिन्यांत ऑस्ट्रेलियाने भारताचा तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभव केला आहे. यापूर्वीच्या दोन फायनलमध्येही (WTC आणि वनडे वर्ल्डकप) भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

रविवारी (११ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेच्या बेनोनी येथील विलोमूर पार्क स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतासमोर विजयासाठी २५४ धावांचे लक्ष्य होते. पण संपूर्ण संघ ४३.५ षटकात १७४ धावांवर गारद झाला.

मात्र, या सामन्यादरम्यानचा एका भारतीय खेळाडूचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओती संवाद ऐकून भारतीय चाहत्यांचा उर भरून आला आहे.

वास्तविक, २५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या विकेट्स ठराविक अंतराने पडतच होत्या. टीम इंडियाने ३१.५ षटकात १२२ धावांवर ८ विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी मुरुगन अभिषेकनेआणि नमन तिवारी फलंदाजी करत होते. तेव्हा नमन तिवारीचा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला. ‘याद रख, हारेंगे पर सीख के जाएंगे’, असे नमन मुरुगन अभिषेक याला सांगताना ऐकू येत आहे.

नमन आणि मुरुगन यांच्यातील या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सामन्यात काय घडलं?

सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ७ गडी गमावून २५३ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून हरजस सिंगने ५५, कर्णधार ह्यू वेबगेनने ४८, ऑलिव्हर पीकने नाबाद ४६आणि हॅरी डिक्सनने ४२ धावा केल्या.

प्रत्युत्तरात भारताचा डाव ४३.५ षटकांत १७४ धावांत गडगडला. भारताकडून आदर्श सिंग ४७ आणि मुरुगन अभिषेक ३२ व्यतिरिक्त, मुशीर खानने २२ आणि नमन तिवारीने नाबाद १४ धावा केल्या. याशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

Whats_app_banner