मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Viral : महिला कुस्तीपटूनं युझी चहलला उचलून गोल फिरवलं, व्हिडीओ पाहाच

Viral : महिला कुस्तीपटूनं युझी चहलला उचलून गोल फिरवलं, व्हिडीओ पाहाच

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 03, 2024 08:45 PM IST

Sangeeta Phogat Lift Yuzvendra Chahal : युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सीझन ११ च्या पाच फायनलिस्टपैकी एक आहे. सागर बोरा हा या सीझनमध्ये तिचा डान्स पार्टनर आहे.

Sangeeta Phogat Lift Yuzvendra Chahal
Sangeeta Phogat Lift Yuzvendra Chahal

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू युझवेंद्र चहल त्याच्या लेगस्पिन गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. पण सध्या तो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. चहलचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वास्तविक, युझवेंद्र चहल अलीकडेच रिॲलिटी टीव्ही शो 'झलक दिखला जा' च्या सीझन ११ च्या पार्टीत दिसला. या शोमध्ये त्याची पत्नी धनश्री वर्मा स्पर्धक आहे. तर दुसरीकडे, भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगट देखील या शोची स्पर्धक आहे.

या शोच्या पार्टीतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत संगीता फोगट युजवेंद्र चहलला खांद्यावर घेऊन गोल फिरत असल्याचे दिसत आहे. यावेळी युझी चहल थोडासा घाबरलेला दिसत आहे. तसेच, तो संगीताला खाली उतरण्याची विनंती करताना दिसत आहे.

दरम्यान, युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सीझन ११ च्या पाच फायनलिस्टपैकी एक आहे. सागर बोरा हा या सीझनमध्ये तिचा डान्स पार्टनर आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकांनी खूप मजेदार कमेंट्सही केल्या आहेत.

चहल बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून बाहेर

युजवेंद्र चहल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि अनेकदा आपल्या पत्नीसोबत फोटो शेअर करताना दिसतो. दरम्यान, बीसीसीआयने नुकतीच केंद्रीय करारात असलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत चहलचे नाव नाही. यामुळे आता त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सोबतच, निवड समितीने युझवेंद्र चहलचा पर्याय शोधण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होत आहे. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोन क्रिकेटपटूंनाही बीसीसीआयने केंद्रीय करार दिलेला नाही.

WhatsApp channel