WPL Points Table Update : महिला प्रीमियर लीगमध्ये बुधवारी (२६ फेब्रुवारी) मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सचे संघ आमनेसामने होते. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा सहज पराभव केला. अशाप्रकारे मुंबई इंडियन्सने सलग तिसरा विजय मिळवला.
त्याचबरोबर या विजयानंतर मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. आता मुंबई इंडियन्सचे ४ सामन्यांत ६ गुण झाले आहेत. तसेच नेट रन रेट ०य७८० इतका आहे.
मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र त्यानंतर हरमनप्रीत कौरच्या संघाने गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स या संघाचा पराभव केला.
त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सची पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचे समान ६-६ गुण आहेत, परंतु मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट चांगला आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सनंतर स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर तिसऱ्या स्थानावर आहे.
वास्तविक, याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या क्रमांकावर होते, मात्र मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर ते तिसऱ्या स्थानावर घसरले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ४ सामन्यांत ४ गुण आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिले २ सामने जिंकले होते, मात्र त्यानंतर त्यांना सलग २ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.
यूपी वॉरियर्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. यूपी वॉरियर्सचे ५ सामन्यांत ४ गुण आहेत. त्याचबरोबर या संघांनंतर गुजरात जायंट्सचा क्रमांक लागतो. वास्तविक, गुजरात जायंट्सला आतापर्यंतच्या ४ सामन्यात फक्त १ विजय मिळाला आहे.
गुजरात जायंट्स ४ सामन्यांत २ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. गुजरात जायंट्सला आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने पराभूत केले आहे. तर गुजरात जायंट्सने यूपी वॉरियर्सविरुद्ध विजय मिळवला होता.
संबंधित बातम्या