WPL Final Score MI vs DC : महिला प्रीमियर लीग २०२५चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमवर दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग हिने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
यानंतर मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकात ७ बाद १४९ धावा केल्या. WPL २०२५ मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर आतापर्यंत कोणत्याही संघाने केलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे. अंतिम सामन्यात एमआयची फलंदाजी संघर्ष करताना दिसली, परंतु कर्णधार हरमनप्रीत कौर हिने एकहाती लढा दिला आणि ६६ धावांची खेळी खेळली.
तिच्याशिवाय मोसमातील सर्वाधिक धावा करणाऱ्या नॅट सीव्हर-ब्रंटनेही ३० धावांचे योगदान दिले.
WPL २०२५ मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या १६६ धावा होती, जी एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध केली होती. पण मुंबई चालू हंगामात या मैदानावर सर्वात कमी धावा करणारा संघ ठरला आहे.
आत्तापर्यंत WPL ची एकही फायनल हाय स्कोअरिंग झालेली नाही. दिल्लीच्या गोलंदाजीत नल्लापुरेड्डी, जेस जोनासन आणि मारिजने कॅप यांनी प्रत्येकी २, तर ॲनाबेल सदरलँडला १ विकेट मिळाली.
WPL च्या इतिहासात एकाच मोसमात ५०० धावांचा टप्पा पार करणारा नताली सीव्हर-ब्रंट ही पहिली खेळाडू ठरली आहे. त्याने WPL २०२५ मध्ये एकूण ५२३ धावा केल्या आहेत, ज्यात ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
यापूर्वी हा विक्रम आरसीबीच्या एलिस पेरीच्या नावावर होता, तिने डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये ३४७ धावा केल्या होत्या. या मोसमात ५२३ धावा करण्यासोबतच ब्रंटने फायनलपूर्वी ९ विकेट्सही घेतल्या आहेत. अशा स्थितीत टूर्नामेंटची खेळाडू म्हणून निवड होण्याची ती सर्वात मोठी दावेदार असल्याचे दिसते.
तत्पूर्वी, अवघ्या १४ धावांवर मुंबईने पहिले २ विकेट गमावले होते. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरने नॅट सीयव्हर-ब्रंटसोबत ८९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अंतिम फेरीत मुंबईचे ९ खेळाडू फलंदाजीसाठी आले, त्यापैकी ५ खेळाडू दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत.
संबंधित बातम्या