WPL Auction Live Streaming : उद्या WPL चा लिलाव, कोणत्या संघाकडे सर्वाधिक रक्कम? कोणते खेळाडू लिलावात उतरणार? वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  WPL Auction Live Streaming : उद्या WPL चा लिलाव, कोणत्या संघाकडे सर्वाधिक रक्कम? कोणते खेळाडू लिलावात उतरणार? वाचा

WPL Auction Live Streaming : उद्या WPL चा लिलाव, कोणत्या संघाकडे सर्वाधिक रक्कम? कोणते खेळाडू लिलावात उतरणार? वाचा

Dec 14, 2024 10:24 PM IST

WPL 2025 Player Auction : महिला प्रीमियर लीग 2025 साठी खेळाडूंचा लिलाव 15 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. 120 खेळाडूंच्या निवडीसाठी 91 भारतीय, 29 परदेशी आणि 3 सहयोगी देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. लिलावाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर आणि जिओसिनेमा अॅपवर उपलब्ध असेल.

WPL Auction Live Streaming : उद्या WPL चा लिलाव, कोणत्या संघाकडे सर्वाधिक रक्कम? कोणते खेळाडू लिलावात उतरणार? वाचा
WPL Auction Live Streaming : उद्या WPL चा लिलाव, कोणत्या संघाकडे सर्वाधिक रक्कम? कोणते खेळाडू लिलावात उतरणार? वाचा (WPL-X)

WPL 2025 Player Auction Live Streaming : महिला प्रीमियर लीग २०२५ साठी खेळाडूंचा लिलाव रविवारी (१५ डिसेंबर) बेंगळुरूयेथे होणार आहे. १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या महिला प्रीमियर लीगच्या मिनी लिलावात १९ जागांसाठी ९१ भारतीय, २९ परदेशी आणि सहयोगी देशांच्या तीन खेळाडूंसह एकूण १२० खेळाडू रिंगणात उतरणार आहेत. 

यावेळी ३० कॅप्ड खेळाडू (९ भारतीय, २१ परदेशी) तर ९० अनकॅप्ड (८२ भारतीय, ८ परदेशी) आहेत. बहुतांश फ्रँचायझींनी आगामी हंगामासाठी आपल्या प्रमुख खेळाडूंना रिटेन केले आहे.

गुजरात जायंट्स सर्वाधिक ४.४ कोटी रुपये घेऊन या लिलावात उतरणार आहे. मिनी लिलावातून त्यांना दोन परदेशी खेळाडूंसह ४ खेळाडूंना खरेदी करायचे आहे. 

तर यूपी वॉरियर्सला एका परदेशी खेळाडूसह तीन जागा भराव्या लागतील, तर मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या ३ संघांना प्रत्येकी ४ खेळाडू खरेदी करावे लागतील. 

WPL 2025 च्या लिलावाशी संबंधित काही महत्वाची माहिती पाहूया -

किती जागा रिक्त आहेत?

WPL २०२५ च्या मिनी लिलावाबद्दल फारशी चर्चा नाही. कारण या स्पर्धेतील सर्व ५ संघांकडे फक्त १९ स्लॉट रिक्त आहेत. म्हणजे लिलावात फक्त १९ जागा भरायच्या आहेत. म्हणजे हा लिलाव दोन तासांत संपू शकतो.

अंतिम लिलावात किती खेळाडू पोहोचले?

४०० हून अधिक नावांच्या लांबलचक यादीतून, बीसीसीआयने फ्रँचायझींकडून मिळालेल्या इनपुट आणि इंटरेस्टच्या आधारे ही यादी १२० पर्यंत कमी केली आहे. या यादीत ९१ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. त्यापैकी ९ कॅप खेळाडू आहेत - आणि २९ परदेशी खेळाडू, जे जास्तीत जास्त ५ स्लॉटसाठी स्पर्धा करतील.

कोणत्या संघाकडे सर्वात मोठी पर्स आहे?

अदानी स्पोर्ट्सलाइनच्या मालकीच्या गुजरात जायंट्सकडे ४ स्लॉट भरण्यासाठी सर्वात जास्त ४.४ कोटी रुपये उपलब्ध आहेत, त्यापैकी २परदेशी खेळाडू असू शकतात. गुजरातने ६ खेळाडूंना रीलीज केले होते.

कोणत्या संघाकडे सर्वात कमी पर्स आहे?

अडीच कोटी रुपयांसह, पहिल्या दोन आवृत्त्यांच्या उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वात लहान पर्स आहे. ते जास्तीत जास्त ४ स्लॉट भरू शकतात, ज्यामध्ये एका परदेशी खेळाडूचा समावेश आहे.

पण एकूण, ५ फ्रँचायझींपैकी प्रत्येकाकडे त्यांचे संघ तयार करण्यासाठी एकूण १५ कोटी रुपयांचे बजेट आहे, गेल्या वर्षी ते १३.५ कोटी रुपये होते.

संघ रचनेचे नियम आयपीएलप्रमाणेच आहेत का?

आयपीएलच्या विपरीत, डब्ल्यूपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर  नियम नाही, याचा अर्थ संघ नाणेफेकीच्या वेळी घोषित केलेल्या ११ खेळाडूंनाच खेळवू शकतात. तथापि, WPL संघ ५ परदेशी खेळाडूंना मैदानात उतरवू शकतात. पण पाचवा खेळाडू असोसिएट देशाचा असवा लागतो.

WPL २०२५ चा लिलाव कधी आणि कोठे होईल?

डब्ल्यूपीएल २०२५ चा लिलाव शनिवारी (१५ डिसेंबर) बेंगळुरू येथे होणार आहे.

WPL २०२५ लिलाव किती वाजता सुरू होईल?

डब्ल्यूपीएल २०२५ चा लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरू होईल.

WPL २०२५ लिलावाचे थेट प्रक्षेपण कोठे होईल?

भारतीय चाहते जिओ सिनेमा अॅपवर डब्ल्यूपीएल २०२५ लिलावाचा ऑनलाइन आनंद घेऊ शकतात.

WPL २०२५ लिलाव टीव्हीवर लाइव्ह कसा पाहावा?

डब्ल्यूपीएल २०२५ लिलावाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सच्या विविध नेटवर्कवर टीव्हीवर होणार आहे.

WPL २०२५ लिलावात किती खेळाडूंचा समावेश आहे?

महिला प्रीमियर लीगच्या मिनी लिलावात ९१ भारतीय, २९ परदेशी खेळाडू आणि सहयोगी देशांतील तीन खेळाडूंसह एकूण १२० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

कोणत्या संघाकडे किती पर्स शिल्लक?

दिल्ली कॅपिटल्स – २.५ कोटी रुपये

गुजरात जायंट्स – ४.४ कोटी 

मुंबई इंडियन्स – २.६५ कोटी 

यूपी वॉरियर्स – ३.९ कोटी

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – ३.२५ कोटी रुपये

Whats_app_banner

संबंधित बातम्या