WPL 2025 DC Women vs MI Women Final : महिला प्रीमियर लीग २०२५ चा अंतिम सामना आज (१५ मार्च) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women Final) यांच्यात होणार आहे. एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडिन्सने गुजरात जायंट्स संघाचा पराभव केला होता. त्यांनी ४७ धावांनी विजय मिळवून फायनलमध्ये एन्ट्री केली होती.
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अंतिम सामना शनिवारी मुंबईत होणार आहे. या सामन्यात मुंबईची खेळाडू नताली सीव्हर ब्रंट एक मोठा विक्रम मोडू शकते. तिला या स्पर्धेत सर्वाधिक १००० धावा पूर्ण करण्याची संधी आहे.
महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्सची नताली सीव्हर ब्रंट अव्वल स्थानावर आहे. तिने आतापर्यंत २८ सामन्यात ९९७ धावा केल्या आहेत. ब्रंटने या कालावधीत ८ अर्धशतके झळकावली आहेत. आता तिला इतिहास रचण्याची संधी आहे. ब्रंट महिला प्रीमियर लीगमध्ये १००० धावा करणारी पहिली खेळाडू बनू शकते. यासाठी तिला फक्त ३ धावांची गरज आहे.
नताली सीव्हर ब्रंटने या हंगामातही अप्रतिम कामगिरी केली आहे. तिने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यात ४९३ धावा केल्या आहेत. या मोसमातही ती सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. तिची सर्वोत्तम धावसंख्या ८० धावा आहे. ब्रंटने दिल्ली कॅपिटल्स महिलांविरुद्ध स्फोटक खेळी खेळली. आता अंतिम फेरीत ती दिल्लीविरुद्ध चमत्कार करू शकते.
मुंबई इंडियन्स: हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नताली सीव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेस जोनासेन, जेमिमाह रॉड्रिग्ज, ॲनाबेल सदरलँड, मारिझान कॅप, सारा ब्राइस (विकेटकीपर), निक्की प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, तितास साधू.
संबंधित बातम्या