महिला प्रीमियर लीग २०२५ चा लिलाव संपला आहे. यामध्ये गुजरात जायंट्सने सर्वाधिक पैसा खर्च केला. गुजरातने लिलावात ४ कोटी रुपये खर्च केले आहेत. तर यूपी वॉरियर्सने सर्वात कमी ५० लाख रुपये खर्च केले.
आता पाचही फ्रँचायझींचे संघ तयार झाले आहेत.या WPL लिलावात ४ खेळाडू करोडपती झाले. यामध्ये भारताच्या सिमरन शेख, जी कमलिनी आणि प्रेमा रावत यांचा समावेश आहे.
WPL लिलावात गुजरातने सर्वाधिक पैसे खर्च केले. दोन सर्वात महागडे खेळाडूही त्याने विकत घेतले. गुजरातने सिमरन शेखला 1.90 कोटींना विकत घेतले. या लिलावात सिमरन ही सर्वात महागडी खेळाडू ठरली. ती मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळते आणि तिने अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे.
सिमरनसोबतच गुजरातने वेस्ट इंडिजची अष्टपैलू खेळाडू डिआंड्रा डॉटिनवरही मोठा खर्च केला. डॉटिनला गुजरातने १.७० कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत ५० लाख रुपये होती.
डॉटिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वेळा चमत्कार दाखवले आहेत. तिने हंड्रेड आणि महिला बिग बॅश लीगमध्येही चांगली कामगिरी केली आहे.
जी कमलिनी भारताच्या १९ वर्षांखालील महिला संघात खेळली आहे. तिने अलीकडेच पाकिस्तानविरुद्ध स्फोटक खेळी खेळली. कमलिनीला मुंबई इंडियन्सने १.६० कोटी रुपयांना विकत घेतले. तिची मूळ किंमत १० लाख रुपये होती.
तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिलांनी प्रेमा रावतसाठी खजिना उघडला. प्रेमाला १.२० कोटी रुपयांना विकत घेतले. प्रेमाची मूळ किंमतही १० लाख रुपये होती.
सिमरन शेख - १.९० कोटी रु. - गुजरात जायंट्स
डिआंड्रा डॉटिन - १.७० कोटी रु. - गुजरात जायंट्स
जी कमलिनी - . १.६० कोटी रु.- मुंबई इंडियन्स
प्रेमा रावत - र१.२० कोटी रु. - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
संबंधित बातम्या