मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  लाईव्ह सामन्यात मैदानात घुसला प्रेक्षक, महिला क्रिकेटपटूने सायमंड्सच्या स्टाईलने शिकवला धडा,पाहा

लाईव्ह सामन्यात मैदानात घुसला प्रेक्षक, महिला क्रिकेटपटूने सायमंड्सच्या स्टाईलने शिकवला धडा,पाहा

Feb 29, 2024 12:25 PM IST

Security Breached in WPL 2024 : महिला प्रीमियर लीगमध्ये बुधवारी युपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान एका प्रेक्षक मैदानात घुसला. तो खेळपट्टीच्या दिशेने धावत होता, पण तेवढ्यात ॲलिसा हिलीने त्याला रोखले.

Security Breached in WPL 2024
Security Breached in WPL 2024

Security Breached in WPL 2024, UPW vs MIW : भारतात सध्या महिला प्रीमियर लीगचा (WPL 2024) थरार सुरू आहे. या स्पर्धेत बुधवारी (२८ फेब्रुवारी) यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात यूपीने चमकदार खेळ करत ७ विकेट्सने विजय मिळवला.

पण या सामन्यादरम्यान एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. लाईव्ह सामन्यात एक प्रेक्षक सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकमा देत अचानक मैदानात घुसला. तो खेळपट्टीजवळ पोहोचला. हे पाहून यूपी वॉरियर्सची कर्णधार आणि यष्टीरक्षक ॲलिसा हिलीने खतरनाक स्टाईलने रोखले. त्या प्रेक्षकाला हिलीने पीचवरून धावू दिले नाही.

ट्रेंडिंग न्यूज

ॲलिसा हिली ही ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कची पत्नी आहे. तर तिचे काका इयान हिली हे देखील ऑस्ट्रेलियाचे महान यष्टिरक्षक राहिले आहेत.

WPL 2024 च्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या डावाच्या शेवटच्या षटकात ही घटना घडली. यावेळी एक प्रेक्षक सुरक्षेचा भंग करत भर मैदानात आला. यानंतर एलिसा हिलीच्या लक्षात आले की, तो पीचवर धावला तर खेळपट्टी खराब होईल, त्यानंतर तिने या प्रेक्षकाला पकडले आणि त्याला पीचपासून दूर केले. या घटनेमुळे थोडावेळ खेळ थांबला होता. यानंतर सर्वकाही सुरळीत झाले.

हिलीची स्टाईल पाहून अँड्र्यू सायमंड्सची आठवण

दरम्यान, ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू सायमंड्स अशाच पद्धतीने मैदाना घुसलेल्या व्यक्तींना रोखायचा. तर गेल्या वर्षीच्या ॲशेस कसोटीदरम्यान इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोनेही लॉर्ड्सवर घुसलेल्या एका प्रेक्षकाला उचलून मैदानाबाहेर नेऊन सोडले होते.

युपीने सामना सहज जिंकला

या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा ७ विकेट्सनी पराभव केला. प्रथम खेळताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत ६ बाद १६१ धावा केल्या होत्या. यूपी वॉरियर्सने हे लक्ष्य १६.३ षटकांत ३ फलंदाज गमावून पूर्ण केले. 'प्लेअर ऑफ द मॅच' किरण नवगिरेने यूपी वॉरियर्सकडून ५७ धावांची शानदार खेळी केली. आपल्या खेळीत किरणने ३१ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार आणि ४ षटकार ठोकले.

WhatsApp channel