महिला प्रीमियर लीग २०२४ च्या (WPL 2024) १७ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीची अवघ्या एका धावेने पराभव केला. या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. आरसीबीला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज होती, परंतु पहिलीच धाव घेताना ऋचा घोष धावबाद झाली आणि दिल्ली कॅपिटल्सने हा सामना एका धावेने जिंकला.
या विजयासह दिल्ली प्लेऑफसाठी पात्र ठरली. त्याचवेळी आरसीबीच्या पराभवानंतर रिचा घोष मैदानावरच रडू लागली. कर्णधार स्मृती मानधनासह संपूर्ण संघ यावेळी भावनिक झाला होता. या भावनिक क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वास्तविक, दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १९० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीकडून रिचा घोषने शानदार फलंदाजी करताना अर्धशतक ठोकले. पण शेवटच्या चेंडूवर ती धावबाद झाली, त्यानंतर तिला तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती मैदानावरच रडू लागली. रिचाला या अवस्थेत पाहून विरोधी संघातील खेळाडूही भावनिक झाले होते. यानंतर दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग आणि जेमिमाह रॉड्रिग्सने रिचा घोषचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रन आऊट झाल्यानंतर रिचा घोष मैदानावरच बसून रडू लागली. तसेच, कॅप्टन स्मृती मानधना आपले अश्रू लपवताना दिसली. श्रेयंका पाटीलही भावूक झाली होती.
दरम्यान, दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना आरसीबीसमोर विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात आरसीबीने २० षटकांत १८० धावांपर्यंत मजल मारली. त्यांचा केवळ एका धावेने पराभव झाला. दिल्लीकडून जेमिमाह रॉड्रिग्सने अर्धशतक केले. तर एलिस कॅप्सिने ४९ धावा केल्या.
संबंधित बातम्या