Wpl Full Schedule : महिला प्रीमियर लीगचं वेळापत्रक जाहीर, २३ फेब्रुवारीला या संघांमध्ये रंगणार पहिला सामना
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Wpl Full Schedule : महिला प्रीमियर लीगचं वेळापत्रक जाहीर, २३ फेब्रुवारीला या संघांमध्ये रंगणार पहिला सामना

Wpl Full Schedule : महिला प्रीमियर लीगचं वेळापत्रक जाहीर, २३ फेब्रुवारीला या संघांमध्ये रंगणार पहिला सामना

Jan 23, 2024 06:18 PM IST

Wpl 2024 Schedule : महिला प्रीमियर लीगचे सामने दोन टप्प्यात खेळवले जातील. पहिला टप्पा बेंगळुरू आणि दुसरा टप्पा दिल्लीत खेळला जाईल. ५ संघांमध्ये एकूण २२ सामने रंगणार आहेत. WPL चे पहिले संपूर्ण सीझन केवळ मुंबईत पार पडले होते.

Wpl 2024 Full Schedule
Wpl 2024 Full Schedule

Wpl 2024 Full Schedule : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या दुसऱ्या सीझनचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेची सुरुवात २३ फेब्रुवारीपासून बेंगळुरू येथून होणार आहे. WPL चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार असून हा सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे.  गेल्या मोसमातील विजेतेपदाचा सामना या दोन्ही संघांमध्ये झाला होता. 

महिला प्रीमियर लीगचे सामने दोन टप्प्यात खेळवले जातील. पहिला टप्पा बेंगळुरू आणि दुसरा टप्पा दिल्लीत खेळला जाईल. ५ संघांमध्ये एकूण २२ सामने रंगणार आहेत. WPL चे पहिले संपूर्ण सीझन केवळ मुंबईत पार पडले होते.

WPL चा अंतिम सामना १७ मार्चला होईल. याआधी १५ मार्चला एलिमिनेटर सामना होणार आहे. दोन्ही सामने दिल्लीत होणार आहेत. 

बेंगळुरू लेग ४ मार्चपर्यंत चालेल आणि त्यानंतर WPL चा दुसरा टप्पा दिल्लीत खेळला जाईल. दुसऱ्या टप्प्यात डबल हेडर होणार नाहीत. सर्व सामने अरूण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होतील. 

महिला प्रीमियर लीगचं वेळापत्रक (बंगळुरू लेग)

सर्व सामने सायंकाळी ७:३० वाजता सुरू होतील

२३ फेब्रुवारी- मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स 

२४ फेब्रुवारी- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वि. यूपी वॉरियर्स 

२५ फेब्रुवारी- गुजरात जायंट्स वि. मुंबई इंडियन्स 

२६ फेब्रुवारी- यूपी वॉरियर्स वि. दिल्ली कॅपिटल्स 

२७ फेब्रुवारी- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वि. गुजरात जायंट्स  

२८ फेब्रुवारी- मुंबई इंडियन्स वि. यूपी वॉरियर्स 

२९ फेब्रुवारी- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वि. दिल्ली कॅपिटल्स

१ मार्च- यूपी वॉरियर्स वि. गुजरात जायंट्स 

२ मार्च- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वि.  मुंबई इंडियन्स 

२ मार्च- गुजरात जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स 

४ मार्च- 4 यूपी वॉरियर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

महिला प्रीमियर लीगचं वेळापत्रक (दिल्ली लेग) 

५ मार्च- दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स

६ मार्च- गुजरात जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 

७ मार्च- यूपी वॉरियर्स वि. मुंबई इंडियन्स 

८ मार्च- दिल्ली कॅपिटल्स वि. यूपी वॉरियर्स 

९ मार्च- मुंबई इंडियन्स वि. गुजरात जायंट्स 

१० मार्च- दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 

११ मार्च- गुजरात जायंट्स वि. यूपी वॉरियर्स 

१२ मार्च -मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

१३ मार्च- दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात जायंट्स

१५  मार्च- एलिमिनेटर 

१७  मार्च फायनल

महिला प्रीमियर लीग २०२४ कधी सुरू होईल?

WPL चा दुसरा सीझन २३ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होणार आहे.

महिला प्रीमियर लीग २०२४ चे सामने कोणत्या मैदानांवर होणार आहेत?

महिला प्रीमियर लीगचे सामने बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियम आणि नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहेत.

महिला प्रीमियर लीग २०२४ मधील सामन्यांच्या वेळ काय असेल?

महिला प्रीमियर लीग २०२४ मधील सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरू होतील.

महिला प्रीमियर लीग २०२४ चे सामने कोणत्या टीव्हीवर दिसतील?

महिला प्रीमियर लीग २०२४ चे सामने स्पोर्ट्स 18 एचडी/एसडी या चॅनेलवर दिसतील.

महिला प्रीमियर लीग २०२४ च्या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग कोणत्या अ‍ॅपवर होईल?

महिला प्रीमियर लीग २०२४ च्या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग Jio Cinema या अ‍ॅपवर होणार आहे.

 

Whats_app_banner