मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  WPL 2024 : यंदा मुंबईत सामने होणार नाहीत! महिला प्रीमियर लीगसाठी BCCI ने निवडली ही दोन शहरं, पाहा

WPL 2024 : यंदा मुंबईत सामने होणार नाहीत! महिला प्रीमियर लीगसाठी BCCI ने निवडली ही दोन शहरं, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 12, 2024 08:00 PM IST

Womens Premier League 2024 Venue : मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धेचा दुसरा सीझन बेंगळुरू आणि दिल्ली या शहरांमध्ये खेळवला जाईल.

Womens Premier League 2024 Venue
Womens Premier League 2024 Venue

महिला प्रीमियर लीगच्या आगामी सीझनबाबत (WPL 2024) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला प्रीमियर लीगचा पहिला सीझन म्हणजे WPL 2023 मुंबईमध्ये खेळला गेला होता. स्पर्धेतील सर्व २२ सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळले गेले.

पण आता मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धेचा दुसरा सीझन बेंगळुरू आणि दिल्ली या शहरांमध्ये खेळवला जाईल.

'इएसपीएन क्रिक इन्फो' च्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) WPL 2024 चे आयोजन करण्यासाठी दिल्ली आणि बंगळुरूची निवड केली आहे.

ही स्पर्धा २२ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान खेळली जाऊ शकते. स्पर्धेचा पहिला टप्पा बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. याशिवाय, नॉकआऊट सामन्यांसह स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचे सामने दिल्लीत होणार आहेत.

मुंबई इंडियन्स पहिल्या सीझनची चॅम्पियन

डब्ल्यूपीएलची सुरुवात गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये झाली. पहिल्या सीझनमध्ये स्पर्धेत एकूण ५ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा दुसरा हंगामही ५ संघांमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या सत्रात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ अंतिम फेरीत पोहोचले होते. या मुंबई इंडियन्सने बाजी मारली होती.

आयपीएल १२ शहरांमध्ये रंगणार

महिला प्रीमियर लीगचे सामने केवळ दोन शहरांमध्ये खेळले जाणार आहेत. तर आयपीएलचे सामने १२ शहरांमध्ये रंगणार आहेत.

डब्ल्यूपीएलचे सामने दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये आयोजित केले जाणार आहेत. दुसरीकडे, आयपीएलमध्ये सर्व १० संंघ आपापल्या घरच्या मैदानावर म्हणजे १० मैदानांवर सामने खेळतील, याशिवाय, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जचे सामने त्यांच्या घरच्या मैदानाव्यतिरिक्त इतर दोन मैदानांवरही होतील.

यावेळच्या आयपीएलचे वेळापत्रक लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात येणार आहे. आयपीएल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते.

WhatsApp channel