WTC फायनलच्या शर्यतीत श्रीलंकेची एन्ट्री, पुणे कसोटीनंतर टीम इंडियाचं मोठं नुकसान, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  WTC फायनलच्या शर्यतीत श्रीलंकेची एन्ट्री, पुणे कसोटीनंतर टीम इंडियाचं मोठं नुकसान, पाहा

WTC फायनलच्या शर्यतीत श्रीलंकेची एन्ट्री, पुणे कसोटीनंतर टीम इंडियाचं मोठं नुकसान, पाहा

Published Oct 26, 2024 05:33 PM IST

WTC Points Table Update : भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे. मात्र, या पराभवानंतरही भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

WTC फायनलच्या शर्यतीत श्रीलंकेची एन्ट्री, पुणे कसोटीनंतर टीम इंडियाचं मोठं नुकसान, पाहा
WTC फायनलच्या शर्यतीत श्रीलंकेची एन्ट्री, पुणे कसोटीनंतर टीम इंडियाचं मोठं नुकसान, पाहा (AFP)

पुणे कसोटीत न्यूझीलंडने भारताचा ११३ धावांनी धुव्वा उडवला. मायदेशातच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ११३ धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे न्यूझीलंडने भारतीय भूमीवर मालिका जिंकून इतिहास रचला. त्याचवेळी भारतीय संघाने तब्बल १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे.

या पराभवानंतर भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे. मात्र, या पराभवानंतरही भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पण दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आता फारच कमी अंतर उरले आहे.

WTC गुणतालिकेत भारत आता कुठे आहे?

पुणे कसोटीपूर्वी भारतीय संघ ६८.०६ पीसीटीसह अव्वल होता, पण भारताचा पीसीटी ६२.८२ झाला आहे. भारतानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ६२.५ पीसीटीसह भारतानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.

अशा प्रकारे भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये फारच कमी अंतर उरले आहे. त्याचवेळी भारतीय संघाचा पराभव आणि न्यूझीलंडच्या विजयामुळे श्रीलंकेच्या संधी सुधारल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंका तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंका ५५.५६ पीसीटीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

तर न्यूझीलंड ५० पीसीटीसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आता अशाप्रकारे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ४ संघांमध्ये रंजक लढत पाहायला मिळत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानला फायदा

पाकिस्तान संघाने दीर्घ कालावधीनंतर मायदेशात कसोटी मालिका जिंकण्यात यश मिळवले. अशा परिस्थितीत पाकिस्तानी संघ आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. ज्यात त्यांच्या गुणांची टक्केवारी ३३.३३ आहे. याशिवाय आता बांगलादेशचा संघ आठव्या स्थानावर पोहोचला आहे, तर वेस्ट इंडिजचा संघ ९व्या स्थानावर आहे.

तर इंग्लंड सहाव्या स्थानावर आहे आणि त्यांच्या गुणांची टक्केवारी ४०.७९ आहे. या कसोटी मालिकेतील पराभवानंतर आता इंग्लंडला या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे जवळपास सर्व दरवाजे बंद झाले आहेत.

दरम्यन, श्रीलंका तिसऱ्या स्थानावर तर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानला दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध अजून २-२ कसोटी मालिका खेळायच्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या