India WTC 2025-27 Schedule : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२०२५ या सायकल आता शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया पोहोचले आहेत. तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावल्याने टीम इंडिया या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. WTC फायनल ११ जूनपासून इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.
पण सर्वांच्या नजरा पुढील टेस्ट चॅम्पियनशिपच्या वेळापत्रकाकडे लागल्या आहेत. येथे आपण पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन कधीपासून सुरू होणार आहे आणि टीम इंडियाची पहिली मालिका कोणासोबत होणार आहे, हे जाणून घेऊया.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२०२७ ही WTC फायनल २०२५ नंतर सुरू होईल. म्हणजेच, WTC फायनल ११ जूनपासून होणार आहे. यानंतर लगेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पुढची आवृत्ती सुरू होईल.
पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील भारताची पहिली मालिका इंग्लंडविरुद्ध होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात जून २०२५ मध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. याशिवाय जूनमध्येच श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आणि वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातही कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे.
भारत आपली पहिली मालिका इंग्लंडविरुद्ध खेळणार असून ही मालिका जूनमध्ये खेळवली जाणार आहे. उभय संघांमध्ये ५ कसोटी सामने होणार असून ही मालिका जुलैच्या शेवटच्या आठवड्यात संपणार आहे.
इंग्लंडचा हा दौरा संपल्यानंतर भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज संघाचे यजमानपद भूषवणार आहे. टीम इंडियाला कॅरेबियन संघाविरुद्ध मायदेशात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळावी लागणार आहे. भारतीय संघ २०२५ च्या हंगामाची सांगता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने करेल.
टीम इंडियाला ऑगस्ट २०२६ मध्ये श्रीलंकेचा दौरा करायचा आहे, जिथे दोन संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जातील आणि त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा करेल. त्यानंतर WTC २०२५-२७ मधील भारताची शेवटची मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध असेल, ज्यामध्ये ५ कसोटी सामने खेळले जातील.
संबंधित बातम्या