टीम इंडियाचा सलग दोनदा WTC फायनलध्ये पराभव का झाला? कोणती उणीव होती, संघ आता किती तयार? वाचा-world test championship finals history why india lost both wtc finals againts new zealand and australia now target wtc ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  टीम इंडियाचा सलग दोनदा WTC फायनलध्ये पराभव का झाला? कोणती उणीव होती, संघ आता किती तयार? वाचा

टीम इंडियाचा सलग दोनदा WTC फायनलध्ये पराभव का झाला? कोणती उणीव होती, संघ आता किती तयार? वाचा

Sep 17, 2024 07:49 PM IST

World test championship finals : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला अंतिम सामना २०२१ मध्ये आणि दुसरा विजेतेपदाचा सामना २०२३ मध्ये झाला. भारताने दोन्ही वेळा अंतिम फेरी गाठली, पण दोन्हीवेळा अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.

world test championship final : टीम इंडिया सलग दोन WTC फायनल का हरली? संघात कोणती उणीव; यावेळी संघ किती तयार? वाचा
world test championship final : टीम इंडिया सलग दोन WTC फायनल का हरली? संघात कोणती उणीव; यावेळी संघ किती तयार? वाचा

कसोटी क्रिकेटचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. क्रिकेटमध्ये टी-१0 आणि टी-20 ची लोकप्रियता वाढली. अशा परिस्थितीत कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी ICC ने २०१९ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू केली.

या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला अंतिम सामना २०२१ मध्ये आणि दुसरा विजेतेपदाचा सामना २०२३ मध्ये झाला. भारताने दोन्ही वेळा अंतिम फेरी गाठली, पण दोन्हीवेळा अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.

आता २०२५ ची WTC फायनल जवळ येत आहे आणि भारत सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. अशा स्थितीत भारत सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेची फायनल खेळू शकतो.

पण त्याआधी जाणून घेऊया, की भारताला गेल्या दोन वेळा पराभवाचा सामना का करावा लागला?

भारताचा WTC फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभव का झाला?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा ८ विकेट्सच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्या सामन्यात, २ फिरकी गोलंदाजांसह जाणे ही टीम इंडियाची सर्वात मोठी चूक ठरली, जे इंग्लंडच्या पीचवर विकेट घेण्यात पूर्णपणे संघर्ष करताना दिसले.

दोन्ही डावात भारताची फलंदाजी फ्लॉप राहिली. पहिल्या डावात ३ बाद १४९ धावा केल्यानंतर टीम इंडिया २१७ धावांवर ऑलआऊट झाली. दुसऱ्या डावातही ठराविक अंतराने विकेट्स गमावल्याने संघाची धावसंख्या १७० अशी झाली. अशा स्थितीत भारताला केन विल्यमसनच्या संघासमोर पराभवाचे तोंड पाहावे लागले.

भारताचा WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचे कारण

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या अंतिम सामन्यात म्हणजेच २०२३ च्या WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध २०९ धावांनी सहज विजय मिळवला होता. पहिल्या डावात भारतीय गोलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होते, त्यामुळे कांगारू संघ ४६९ धावा करण्यात यशस्वी ठरला.

त्याचबरोबर २०२१ च्या फायनलप्रमाणे यावेळीही भारताचे फलंदाज मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरले. यानंतर गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारताने चौथ्या डावात ४४४ धावांचे मोठे लक्ष्य मिळाले. त्याचवेळी या फायनलमध्ये रविचंद्रन अश्विनला न खेळवणं ही टीम इंडियाची मोठी चूक ठरली.

आता २०२५ च्या WTC फायनलची तयारी

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनताच कसोटी संघाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. खेळाडूंनाही देशांतर्गत सामने खेळण्यास सांगितले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह काही वरिष्ठ खेळाडू वगळता सर्व खेळाडू दुलीप ट्रॉफी २०२४ च्या पहिल्या फेरीत खेळताना दिसले.

दीर्घ फॉरमॅटमध्ये अधिक खेळल्याने भारतीय खेळाडूंना आगामी कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्यास नक्कीच मदत होईल. टीम इंडिया २०२५ च्या फायनलमध्ये पोहोचली, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली संघात राहतील, तर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनाही टॉप ऑर्डर बॅटिंगची जबाबदारी घ्यावी लागेल.

तर मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजी हाताळताना दिसतील आणि रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन फिरकी गोलंदाजीत दम दाखवतील.

Whats_app_banner