World Test Championship Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आतापर्यंत दोन अंतिम सामने झाले आहेत. हे दोन्ही अंतिम सामने इंग्लंडच्या भूमीवर खेळले गेले. २०२१ ची फायनल साउथॅम्प्टनमध्ये आणि २०२३ ची WTC ची फायनल ओव्हल येथे झाली होती. यानंतर आता पुढच्या WTC फायनलचे (WTC 2025) ठिकाण निश्चित झाले आहे. पुढची WTC फायनलदेखील इंग्लंडमध्येच लॉर्ड्सवर खेळवण्यात येणार आहे.
दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सर्वच संघ जोरदार प्रयत्न करत आहेत. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिज विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे.
पण अशातच एक मोठा खुलासा झाला आहे. वास्तविक, २०२५ आणि २०२७ या दोन्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल इंग्लंडमध्ये होणार आहेत.
डब्ल्यूटीसीचे अंतिम सामने या देशात होणार आहेत
एका मीडिया रिपोर्टनुसार, आयसीसीने ने २०२४-२०२७ या कालावधीसाठी सोशल रिसपॉन्सिबिलिटी प्रोव्हाईडर यासाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये महत्वाच्या आयसीसी स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत, याची माहिती देण्यात आली आहे. त्यावरून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ आणि २०२७ चे अंतिम सामने इंग्लिश भूमीवरच होणार आहेत.
आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे दोन सीझन झाले आहेत. सध्या तिसरा सीझन खेळला जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१ आणि २०२३ या दोन्ही वेळी भारत या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला होता. पण या दोन्ही WTC फायनलमध्ये भारताचा पराभव झाला.
२०२१ मध्ये भारताला न्यूझीलंडने धूळ चारली तर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा धुव्वा उडवला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावर आहे. संघाची विजयाची टक्केवारी ६१.११ आहे. भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर असून त्यांची विजयाची टक्केवारी ५४.१६ आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या, न्यूझीलंड चौथ्या आणि बांगलादेश पाचव्या क्रमांकावर आहे. या तिन्ही संघांची विजयी टक्केवारी ५० आहे.