WTC फायनलची चुरस वाढली, श्रीलंकेविरुद्ध आफ्रिकेच्या मोठ्या विजयानंतर टीम इंडियाची स्थिती काय? पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  WTC फायनलची चुरस वाढली, श्रीलंकेविरुद्ध आफ्रिकेच्या मोठ्या विजयानंतर टीम इंडियाची स्थिती काय? पाहा

WTC फायनलची चुरस वाढली, श्रीलंकेविरुद्ध आफ्रिकेच्या मोठ्या विजयानंतर टीम इंडियाची स्थिती काय? पाहा

Nov 30, 2024 06:52 PM IST

WTC 2023-25 Points Table : पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा पराभव केला. या विजयासह आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल केला आहे.

WTC फायनलची चुरस वाढली, श्रीलंकेविरुद्ध आफ्रिकेच्या मोठ्या विजयानंतर टीम इंडियाची स्थिती काय? पाहा
WTC फायनलची चुरस वाढली, श्रीलंकेविरुद्ध आफ्रिकेच्या मोठ्या विजयानंतर टीम इंडियाची स्थिती काय? पाहा (AFP)

WTC 2023-25 Points Table After SA vs SL 1st Test : श्रीलंकेचा क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा २३३ धावांनी पराभव केला. या विजयासह आफ्रिकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल केला आहे.

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून आफ्रिकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसरे स्थान निश्चित केले आहे. यापूर्वी आफ्रिका पाचव्या स्थानावर होती.

टीम इंडियाला नुकसान नाही

दरम्यान, आफ्रिकेच्या विजयामुळे टीम इंडियाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. आफ्रिका-श्रीलंका कसोटीपूर्वीही भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर होता आणि आजही पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाची सर्वाधिक ६१.११ विजयाची टक्केवारी आहे. टीम इंडियाने २०२३-२५ ​​वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये १५ टेस्ट खेळल्या आहेत, त्यापैकी ९ जिंकल्या आहेत. ५ सामने गमावले आणि १ अनिर्णित राहिला.

ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर 

या विजयानंतर आफ्रिका दुसऱ्या स्थानावर तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर आफ्रिकेची विजयाची टक्केवारी ५९.२६ झाली आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ५७.६९ आहे. यानंतर न्यूझीलंडचा संघ ५४.५५ टक्के विजयासह चौथ्या स्थानावर आहे.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत झालेला श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. श्रीलंकेची विजयाची टक्केवारी ५० आहे. या चक्रात श्रीलंकेने आतापर्यंत १० कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये संघाने ५ जिंकले असून ५ सामने गमावले आहेत.

Whats_app_banner