axar patel world cup : आशिया चषक 2023 च्या फायनलपूर्वी भारतीय संघाला अष्टपैलू अक्षर पटेलच्या रूपाने मोठा धक्का बसला होता. बांगलादेशविरुद्धच्या सुपर-४ सामन्यात अक्षर पटेलला दुखापत झाली. यानंतर आशिया कपच्या फायनलसाठी स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. अक्षरची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अशा परिस्थितीत अक्षर दुखापतीमुळे विश्वचषक खेळू शकला नाही, तर त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा विश्वचषक संघात समावेश केला जाऊ शकतो. ५ सप्टेंबर रोजी विश्वचषकासाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये अक्षर पटेलच्या नावाचा समावेश करण्यात आला. मात्र, भारतीय संघ २८ सप्टेंबरपर्यंत संघात बदल करू शकतो. अशा परिस्थितीत अक्षरची दुखापत गंभीर असेल आणि तो वर्ल्डकपसाठी उपलब्ध होऊ शकला नाही तर वॉशिंग्टन सुंदरसह पुढील ४ खेळाडूंना वर्ल्डकप संघात संधी मिळू शकते.
सर्व प्रथम आशिया कप फायनलप्रमाणे विश्वचषक संघात अक्षरची जागा फक्त वॉशिंग्टन सुंदरच घेऊ शकतो. सुंदर भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो. अक्षर नसेल तर त्याची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित आहे.
दीपक हुडा हा अष्टपैलू फलंदाज आहे. फलंदाजीसोबतच तो फिरकी गोलंदाजीतही संघासाठी प्रभावी ठरू शकतो. फलंदाजी लक्षात घेऊन विश्वचषक संघात अक्षरच्या जागी दीपक हुडाला संधी दिली जाऊ शकते. दीपक भारताकडून व्हाईट बॉल क्रिकेट खेळतो.
फलंदाजीच्या दृष्टिकोनातून भारतीय मॅनेजमेंट तिलक वर्माकडे पाहू शकते. तिलकने मधल्या फळीत संघासाठी चांगला फलंदाज असल्याचे सिद्ध केले आहे. तिलकही संघासाठी मधल्या फळीत डावखुरा एक्स-फॅक्टर ठरू शकतो. सोबतच तो फिरकी गोलंदाजीही करतो.
अक्षरच्या जागी स्टार वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा वर्ल्ड कप संघात समावेश केला जाऊ शकतो. उमरान हा वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी महत्त्वाचा वेगवान गोलंदाज ठरू शकतो. त्याचा वेग फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. अशा स्थितीत त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो.