महिला टी-20 विश्वचषक २०२४ च्या बाद फेरीला सुरुवात झाली आहे. उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. या स्पर्धेच्या साखळी टप्प्यात अनेक मोठे आणि धक्कादायक पाहायला मिळाले, ज्यामध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही. ,
तसेच, भारतासोबतच इंग्लंड हा दुसरा मोठा संघ ठरला ,जो अंतिम चारमध्ये स्थान मिळवू शकला नाही.
यानंतर आता महिला टी-20 वर्ल्डकपच्या सेमी फायनल सामन्यांना १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत, महिला T20 विश्वचषक स्पर्धेत कोणते चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत आणि त्यांच्यात कधी सामना होईल हे जाणून घेऊया.
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ अ गटात होता तर दक्षिण आफ्रिकेने ब गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. १७ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मैदानात उतरतील.
अ गटात ऑस्ट्रेलियन संघ साखळी टप्प्यातील चारही सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेने चारपैकी तीन सामने जिंकून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले होते.
पहिला उपांत्य सामना जिंकणारा संघ रविवारी (२० ऑक्टोबर) होणाऱ्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे.
स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना १८ ऑक्टोबर रोजी शारजाह क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. दुसऱ्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात लढत होणार आहे. न्यूझीलंड संघाने अ गटातील चारपैकी तीन सामने जिंकून सेमी फायनल गाठली. ते गुणतालिकेत ऑस्ट्रेलियानंतर ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
तर वेस्ट इंडिजचा संघ ब गटातील अव्वल संघ आहे. वेस्ट इंडिजनेही चारपैकी तीन सामने जिंकले, पण चांगल्या नेटरनेरटमुळे ते दक्षिण आफ्रिकेच्या पुढे गेले आणि गुणतालिकेत पहिल्या स्थानावर राहिले.
संबंधित बातम्या