womens day 2024 : जगभरात आज शुक्रवारी (८ मार्च) महिला दिन साजरा केला जात आहे. महिलांचा सन्मान करण्यासाठी तसेच, त्यांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील उन्नतीसाठी हा दिवस साजरा केला जातो.
क्रीडा जगतातही अनेक महिलांनी धमाकेदार कामगिरी केली आहे. भारतीय महिलाही क्रीडा क्षेत्रात मागे नाहीत. सानिया मिर्झा, मेरी कोम, मिथाली राज, पीव्ही सिंधू, सायना नेहवाल, साक्षी मलिक यांसारख्या भारतीय महिलांनी जग गाजवले आहे.
अशातच काही दिवसांपूर्वी भारतीय महिला क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक घटना घडली. भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एक पीच क्युरेटर म्हणून एका महिलेची नियुक्ती करण्यात आली. जेसिंथा कल्याण असे त्या महिला पीच क्युरेटरचे नाव आहे.
जेसिंथा कल्याणने WPL 2024 च्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांच्या पीच तयार केल्या. महिला प्रीमियर लीगचे पहिल्या टप्प्यातील सामने बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळले गेले. या मैदानावरील पीच तयार करण्याचे काम जेसिंथा कल्याणने केले.
यानंतर आता देशाची पहिली महिला पीच क्युरेटर म्हणून क्रीडा इतिहासाच्या इतिहासात जॅसिंथा कल्याणचे नाव कोरले आहे.
जॅसिंथा कल्याण ही कर्नाटकची रहिवासी आहे. बेंगळुरूपासून ८० किमी अंतरावर असलेल्या हरोबेले गावात ती मोठी झाली. यापूर्वी ती कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या कार्यालयात रिसेप्शनिस्ट होती. गेल्या तीन दशकांमध्ये तिला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. बेंगळुरूमध्ये झालेल्या wpl च्या सर्व सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करण्याची जबाबदारी तिने सांभाळली आहे. यासह ती भारताची पहिली महिला पिच क्युरेटर ठरली आहे.
संबंधित बातम्या