मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND W vs AUS W ODI : भारतानं ऑस्ट्रेलियाला २५८ धावांवर रोखलं, दीप्ती शर्माचे ५ विकेट

IND W vs AUS W ODI : भारतानं ऑस्ट्रेलियाला २५८ धावांवर रोखलं, दीप्ती शर्माचे ५ विकेट

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 30, 2023 05:02 PM IST

IND W vs AUS W 2nd ODI Scorecard: भारत आणि ऑस्ट्रेलियन महिला संघांमध्ये ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (३० डिसेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे.

IND W vs AUS W 2nd ODI Scorecard
IND W vs AUS W 2nd ODI Scorecard (BCCI Women-X)

India Vs Australia Womens Cricket Scorecard : महिला क्रिकेटमध्ये आज (३० डिसेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ८ बाद २५८ धावा केल्या. भारताला सामना जिंकण्यासाठी २५९ धावा करायच्या आहेत. 

ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डने ६३ आणि एलिस पेरीने ५० धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ५ बळी घेतले.

ऑस्ट्रेलियन संघाला पहिला धक्का कर्णधार एलिसा हिलीच्या रूपाने बसला. २४ चेंडूत १३ धावा करून ती पूजा वस्त्राकरच्या गोलंदाजीवर बोल्ड झाली. तर एलिस पेरीला दीप्ती शर्माने श्रेयंका पाटीलच्या हाती झेलबाद केले. 

पेरीने ४७ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५० धावा केल्या. बेथ मुनीच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला. १७ चेंडूत १० धावा करून ती बाद झाली. मुनीला दीप्तीने एलबीडब्ल्यू केले.

फोबी लिचफिल्ड ९८ चेंडूत ६३ धावा करून बाद झाली. श्रेयंका पाटीलच्या चेंडूवर रिचा घोषने तिचा झेल घेतला. 

शेवटी ताहिला मॅकग्रा ३२ चेंडूत २४ धावा, जॉर्जिया वेरेहॅम २२, अॅनाबेल सदरलँड २३ आणि अलाना किंगने झटपट नाबाद २८ धावांचे योगदान दिले आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्रेयंका पाटील, अमनजोत कौर, रेणुका सिंग ठाकूर, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा.

ऑस्ट्रेलिया: अ‍ॅलिसा हिली (कर्णधार), बेथ मूनी, फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, ताहिला मॅकग्रा, डार्सी ब्राउन, अलना किंग, किम गर्थ, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम.

WhatsApp channel