Women Asia Cup 2024: भारताची फायनलमध्ये धडक; सेमीफायनलमध्ये रेणुका सिंह, स्मृती मानधना यांची चमकदार कामगिरी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Women Asia Cup 2024: भारताची फायनलमध्ये धडक; सेमीफायनलमध्ये रेणुका सिंह, स्मृती मानधना यांची चमकदार कामगिरी

Women Asia Cup 2024: भारताची फायनलमध्ये धडक; सेमीफायनलमध्ये रेणुका सिंह, स्मृती मानधना यांची चमकदार कामगिरी

Jul 26, 2024 05:54 PM IST

India thrash Bangladesh by 10 wickets: क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने बांगलादेशवर १० विकेट्सने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंह आणि सलामीवीर स्मृती मानधनाने दमदार कामगिरी केली.

भारताचा बांगलादेशवर १० विकेट्सने विजय
भारताचा बांगलादेशवर १० विकेट्सने विजय

Women Asia Cup 2024 Semi Final: वेगवान गोलंदाज रेणुका सिंहच्या तीन विकेट्स आणि स्मृती मानधनाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर गतविजेत्या भारताने बांगलादेशवर १० गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने महिला आशिष चषक २०२४ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विजेत्या भारताचा सामना रविवारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्यासंघाशी होणार आहे.

महिला आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना बांगलादेशशी झाला. या सामन्यात भारताने एकाकी सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० षटकांत ८ गडी गमावून ८० धावा केल्या. शेफाली (नाबाद २६ धावा) आणि मानधना (नाबाद ५५ धावा) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने अवघ्या ११ षटकांत ८१ धावांचे लक्ष्य गाठले.

भारतीय महिला संघ आशिया कपमध्ये आतापर्यंत अपराजित राहिला आहे. त्यांनी स्पर्धेच्या सुरुवातीला नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेशचा पराभव केला होता. भारताने पुन्हा एकदा उपांत्य फेरीत बांगलादेशचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या रेणुका ठाकूर सिंहला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेश अर्धा संघ ३५ धावांतच पॅव्हेलियनमध्ये परतला. निगार सुलताना वगळता बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला काही खास कामगिरी करता आली नाही आणि बांगलादेशला २० षटकांत ८० धावापर्यंत मजल मारता आली.बांगलादेशकडून निगार सुलतानाने सर्वाधिक धावा केल्या. तिने ५१ चेंडूत ३२ धावांची खेळी केली, ज्यात दोन चौकारांचा समावेश होता. भारताकडून रेणुका सिंहने भेदक गोलंदाजी केली. तिने चार षटकात २.५ च्या इकोनॉमीने १० धावांत ३ विकेट्स घेतल्या. यासोबत तिने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ५० विकेट्सही पूर्ण केल्या. त्याच्याशिवाय राधा यादवने १४ धावांत ३ विकेट्स घेतल्या.

आंतरराष्ट्रीय महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स

आंतरराष्ट्रीय महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाकिस्तानची गोलंदाज निदा दार पहिल्या क्रमांकावर आहे. निदा हिने आतापर्यंत १५२ सामन्यातील ११४ डावात १४१ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर मेगन शुट १३६ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने ११० सामन्यातील १०९ डावात अशी कामगिरी केली. या यादीत भारताची स्टार खेळाडू दिप्ती शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. दीप्तीने ११६ सामन्यातील ११३ डावात १३० विकेट्स घेतल्या आहे. सोफी एक्लेस्टोन आणि एलिस पेरी अनुक्रमे १२६ आणि १२६ विकेट्ससह चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

 

Whats_app_banner
विभाग