रोहित शर्मा सध्या टीम इंडियाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. २०२४ चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहितने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २०२३ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने फायनलपर्यंतचा प्रवास केला होता.
रोहित शर्मा त्याच्या शानदार कर्णधारपदासाठी तसेच त्याच्या चिल मूडसाठी ओळखला जातो. भारतीय कर्णधार मैदानावर अनेकदा काहीतरी मजेशीर कृत्य करताना दिसतो. तसेच, स्टंप माइक आणि रोहित शर्मा यांच्यातील प्रेम कसे आहे, हे वेगळे सांगायला नको.
दरम्यान, सध्या माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध हिंदी कॉमेंटेटर आकाश चोप्रा यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ते रोहित शर्माच्या खेळाचे नाही तर व्यक्तीमत्वाचे कौतुक करताना दिसत आहेत.
आपल्या चिल मूडसाठी प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा कधीकधी खेळाडूंवर रागावतानाही दिसतो. अनेकवेळा तो मैदानावर खेळाडूंना शिवीगाळ करतानाही दिसतो. त्यामुळे संघातील खेळाडू याविषयी रोहित शर्मावर नाराज होत नाहीत का? हा प्रश्न तुमच्याही मनात निर्माण होत असेल.
त्यामुळे आपण येथे रोहित शर्मा आणि खेळाडूंमधील नाते, याबाबत जाणून घेणार आहोत. आकाश चोप्रा यांनी या व्हायरल व्हिडीओत हेच सांगितले आहे.
भारतीय संघाचे माजी फलंदाज आकाश चोप्रा यांनी रोहित शर्मा आणि त्याच्या वादांबात सांगितले आहे. चोप्रा यांनी सांगितले की, त्यांनी रोहित शर्माबद्दल कोणाकडूनही एकही वाईट गोष्ट ऐकली नाही. तसेच, आजपर्यंत त्यांना एकही असा माणून भेटला नाही, ज्याने रोहित शर्मा हा चांगला व्यक्ती नसल्याचे म्हटले आहे.
आकाश चोप्रा रोहित शर्माबद्दल म्हणाले, “मी असा एकही माणूस पाहिला नाही, मी हे सर्वांबाबत सांगू शकत नाही, परंतु मी रोहितबाबत असे म्हणू शकतो. की मी एकही माणूस असा पाहिला नाही जो असे म्हणेल की रोहित चांगला माणूस नाही.”
चोप्रा पुढे म्हणाले, " असे कोणतरी असेल ना ज्याचे रोहितसोबत पटत नसेल किंवा त्यांचे भांडण झाले असेल. पण नाही. मी अद्याप अशा कोणालाच पाहिले नाही.
मजेदार गोष्ट म्हणजे रोहित माझा मित्र नाही. मी त्याला मित्र म्हणणार नाही.तो माझ्या ओळखीचा आहे, आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा तो माझ्याशी चांगलं वागतो. रोहित शर्मा २४ कॅरेट सोनं आहे".