मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG 3rd Test : राजकोट कसोटीत अश्विनच्या जागी दुसरा खेळाडू खेळू शकतो का? नियम काय? जाणून घ्या

IND vs ENG 3rd Test : राजकोट कसोटीत अश्विनच्या जागी दुसरा खेळाडू खेळू शकतो का? नियम काय? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 17, 2024 11:07 AM IST

Ravichandran Ashwin Replacement : रविचंद्रन अश्विन राजकोट कसोटीतून बाहेर पडला आहे. आता त्याच्या बदली खेळाडूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Ravichandran Ashwin Replacement
Ravichandran Ashwin Replacement (AP)

भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट येथे कसोटी सामना खेळला जात आहे. पण या सामन्यातून टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने अचानक माघार घेतली आहे. तो आता कसोटीचे तीन दिवस खेळणार नाही. कौटुंबिक कारणामुळे तो चेन्नईला परतला आहे.

अशा परिस्थितीत आता अनेक प्रकारचे प्रश्न झाले आहेत. तिसऱ्या कसोटीत अश्विनच्या जागी दुसरा कोणता खेळाडू खेळू शकेल का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 

रविचंद्रन अश्विन या सामन्यातून बाहेर पडल्यानंतर भारताकडे प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त १० खेळाडू उरले आहेत. अश्विन दुखापतीमुळे बाहेर झाला नाही. त्यामुळे अश्विनच्या जागी भारताला इतर खेळाडू मिळू शकणार नाही. म्हणजेच भारताला आता १० खेळाडूंसह सामना खेळावा लागणार आहे.

अश्विनच्या जाण्याने भारतीय संघाकडे आता फक्त ४ गोलंदाज उरले आहेत. अशा परिस्थितीत आता वेगवान गोलंदाजांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. जडेजा आणि कुलदीपची जबाबदारीही वाढली आहे.

स्टोक्सने परवानगी दिली तर भारताला दुसरा खेळाडू मिळेल

दरम्यान, अश्विनच्या जागी भारतीय संघाला दुसरा खेळाडू मिळू शकतो. पण यासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची परवानगी घ्यावी लागेल. जर स्टोक्सने परवानगी दिली तर भारताला अश्विनच्या जागी दुसरा खेळाडू मिळू शकतो. जर असे झाले तर वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेल सामना खेळू शकतो.

ICC चा नियम काय सांगतो?

क्रिकेटमध्ये क्वचितच असे घडले आहे, की एखादा खेळाडू सामन्याच्या मध्यात संघातून बाहेर झाला असेल. दुखापतीमुळे एखादा खेळाडू सामन्याच्या मध्यभागी बाहेर पडल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मात्र, अशा स्थितीत संघ बदली खेळाडूची मागणी करू शकतो. मात्र, विरोधी संघाचा कर्णधार परवानगी देईल तेव्हाच बदली खेळाडू मिळेल. MCC नियम १.२.२ नुसार, प्लेइंग इलेव्हन जाहीर केल्यानंतर, विरोधी संघाच्या कर्णधाराच्या संमतीशिवाय कोणत्याही खेळाडूला बदलता येत नाही.

तसेच, नियम क्रमांक १.२.१ नुसार, संघाच्या कर्णधाराला नाणेफेक करण्यापूर्वी आपल्या १२व्या खेळाडूचे नाव द्यावे लागते, जे या सामन्यात टीम इंडियाने केले नाही. अशा स्थितीत रोहित शर्माला इच्छा असूनही अश्विनची जागी इतर खेळाडू घेता येणार नाही. आता अश्विनच्या जागी एक खेळाडू फक्त क्षेत्ररक्षण करू शकतो. त्याला गोलंदाजी किंवा फलंदाजी करता येणार नाही.

IPL_Entry_Point