भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीत मोठा बदल करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बांगलादेशविरुद्ध ६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
या संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, जेणेकरून संघातील योग्य संयोजन भविष्यातील सामन्यांसाठी तयार करता येईल.
या निवडीत सर्वाधिक चर्चा ऋतुराज गायकवाड याची आहे, ज्याचा या टी-20 मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही. गायकवाड जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि तो भारतातील सर्वात प्रतिभावान टी-20 खेळाडूंपैकी एक मानला जातो. अशा परिस्थितीत त्याची संघातून वगळणे क्रिकेटप्रेमींसाठी धक्कादायक आहे.
ऋतुराज गायकवाड यांच्याबाबत एक खास बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय कसोटी संघाचा तिसरा सलामीवीर म्हणून ऋतुराज गायकवाडकडे पाहिले जात आहे. '
एका वर्तमान पत्राच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांचा बॅकअप म्हणून गायकवाड यांची निवड केली जाऊ शकते.
ही संभाव्य भूमिका लक्षात घेऊन निवडकर्त्यांनी त्याला टी-20 मालिकेतून विश्रांती दिली असून इराणी ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी दिली आहे.
आगामी टी-20 मालिकेत भारताला नवीन खेळाडूंची चाचणी घेण्याची आणि भविष्यासाठी योग्य संघ संयोजन तयार करण्याची संधी असेल. त्याचबरोबर ऋतुराज गायकवाडची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय राहील, पण कसोटी संघातील त्याची संभाव्य भूमिका त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा देऊ शकते.
ऋतुराज गायकवाडला बांगलादेश टी-20 मालिकेतून वगळण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याला इराणी ट्रॉफीसाठी 'रेस्ट ऑफ इंडिया' संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. गायकवाड या स्पर्धेत रणजी करंडक विजेत्या मुंबईविरुद्ध संघाचे नेतृत्व करत आहे. निवडकर्त्यांचा असा विश्वास आहे की गायकवाडला त्याच्या खेळात आणखी सुधारणा करण्याची ही सुवर्ण संधी आहे, ज्यामुळे तो दीर्घ फॉरमॅट क्रिकेटमध्ये आपले स्थान मजबूत करू शकेल.