MS Dhoni : धोनी पुढच्या IPL मध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळेल का? अश्विननं सरळ सांगितलं-will ms dhoni play as uncapped player in ipl 2024 ravichandran ashwin gaveclear answer ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni : धोनी पुढच्या IPL मध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळेल का? अश्विननं सरळ सांगितलं

MS Dhoni : धोनी पुढच्या IPL मध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळेल का? अश्विननं सरळ सांगितलं

Aug 11, 2024 02:34 PM IST

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळताना दिसणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे. पण अश्विनने धोनीबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.

MS Dhoni : धोनी पुढच्या IPL मध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळेल का? अश्विननं सरळ सांगितलं
MS Dhoni : धोनी पुढच्या IPL मध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळेल का? अश्विननं सरळ सांगितलं (ANI)

एमएस धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. यानंतर त्याने फक्त आयपीएल खेळणे सुरू ठेवले आहे. आता पुन्हा एकदा धोनीच्या पुढील आयपीएल म्हणजेच २०२५ मध्ये खेळण्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

४३ वर्षीय धोनी पुढील आयपीएल खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने धोनी पुढील आयपीएल खेळू शकतो, असे सांगितले आहे.

२०२४ च्या आयपीएलमध्ये धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले नव्हते. धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाड संघाची धुरा सांभाळताना दिसला. धोनीने कर्णधार न राहणे हे त्याच्या निवृत्तीचे संकेत होते. मात्र, धोनीकडून निवृत्तीबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून IPL खेळेल का?

अनकॅप्ड खेळाडू म्हणजेच, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. धोनी शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट २०१९ मध्ये खेळला होता. तर २००८ ते २०२१ IPL पर्यंत असा नियम होता, की जो खेळाडू निवृत्त होऊन ५ किंवा त्याहून जास्त वर्षे झाली आहेत, त्याला अनकॅप्ड खेळाडू मानले जाते होते.

ईएसपीएनच्या च्या वृत्तानुसार, बीसीसीआयसोबत आयपीएल संघांच्या मालकांच्या बैठकीत चेन्नई सुपर किंग्जने हा नियम परत आणण्याची मागणी केली होती.

अनकॅप्ड खेळाडूंच्या मुद्द्यावर बोलताना, अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, "धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळेल का? हे एक मोठे प्रश्नचिन्ह आहे. मुद्दा बरोबर आहे. तो अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. तो निवृत्त झाला आहे. म्हणूनच तो एक अनकॅप्ड खेळाडू आहे. तो कॅप्ड खेळाडू नाही. धोनीसारखा खेळाडू अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळू शकत नाही का? हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. साहजिकच धोनीबद्दल कोणी बोलले तर सगळेच याविषयी बोलतील.”