मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  WI vs AUS Highlights : सराव सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा बँड वाजवला, पूरन-पॉवेलने ठोकल्या २५७ धावा

WI vs AUS Highlights : सराव सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा बँड वाजवला, पूरन-पॉवेलने ठोकल्या २५७ धावा

May 31, 2024 11:23 AM IST

WI vs AUS Match Highlights : टी-20 वर्ल्डकपआधी वेस्ट इंडिजने खरा रंग दाखवला आहे. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २५७ धावा केल्या आणि त्यानंतर ३५ धावांनी सामना जिंकला.

WI vs AUS Highlights : सराव सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा बँड वाजवला, पुरन-पॉवेलने ठोकल्या २५७ धावा
WI vs AUS Highlights : सराव सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा बँड वाजवला, पुरन-पॉवेलने ठोकल्या २५७ धावा

WI vs AUS Warm Up Match Highlights : टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या आधी या स्पर्धेतील सराव सामने खेळले जात आहेत. या सराव सामन्यातच वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा बँड वाजवला आहे. गुरुवारी (३० मे) झालेल्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला आहे. ऑस्ट्रेलियाने २२२ धावा केल्या, तरीही वेस्ट इंडिजने २५ धावांनी सामना जिंकला.

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यात वेस्ट इंडिज संघाकडून स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांना चांगलाच महागात पडला. प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजने २० षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात तब्बल २५७ धावांचा पाऊस पाडला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला ७ बाद २२२ धावाच करता आल्या.

वेस्ट इंडिजकडून निकोलस पुरनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने अवघ्या २५ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ७५ धावा केल्या. या खेळीत त्याचा स्ट्राईक रेट ३०० होता. याशिवाय कर्णधार रोव्हमन पॉवेलने २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५२ धावा केल्या. शेरफेन रदरफोर्डने १८ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ४७* धावा केल्या. याशिवाय इतर फलंदाजांनी छोटे पण महत्त्वाचे योगदान दिले.

ऑस्ट्रेलियाने २२२ धावा केल्या

ऑस्ट्रेलियाला २५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २२२ धावांपर्यंतच मजल मारता आली. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारू संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. वॉर्नर आणि ॲश्टन अगर पहिल्या विकेटसाठी केवळ २३ (१० चेंडू) धावा करू शकले. वॉर्नर ६ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर संघाला दुसरा झटका कर्णधार मिचेल मार्शच्या रूपाने बसला, जो केवळ ४ धावा करून बाद झाला.

यानंतर ५व्या षटकात ॲश्टन एगरही पायचीत झाला. एगरने १३ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. त्यानंतर जोश इंग्लिस आणि टीम डेव्हिड यांनी चौथ्या विकेटसाठी ५३ धावा (२८ चेंडू) जोडल्या. ही भागीदारी १० व्या षटकात टीम डेव्हिडच्या विकेटसह संपुष्टात आली आणि ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. टीम डेव्हिडने १२ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २५ धावा केल्या. यानंतर १३व्या षटकात मॅथ्यू वेड बाद झाला. वेडने १४ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २५ धावा केल्या.

त्यानंतर चौदाव्या षटकात जोश इंग्लिशच्या रूपाने संघाला सहावा धक्का बसला. इंग्लिशने चांगली खेळी खेळताना ३० चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या. त्यानंतर नॅथन एलिसच्या रूपाने संघाने सातवी विकेट गमावली. एलिसने २२ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या.

टी-२० वर्ल्डकप २०२४