WI vs AFG : एकाच षटकात ३६ तर, पॉवरप्लेमध्ये ९८ धावा ठोकल्या, निकोलस पूरननं पाडला चौकार-षटकारांचा पाऊस
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  WI vs AFG : एकाच षटकात ३६ तर, पॉवरप्लेमध्ये ९८ धावा ठोकल्या, निकोलस पूरननं पाडला चौकार-षटकारांचा पाऊस

WI vs AFG : एकाच षटकात ३६ तर, पॉवरप्लेमध्ये ९८ धावा ठोकल्या, निकोलस पूरननं पाडला चौकार-षटकारांचा पाऊस

Jun 18, 2024 10:47 AM IST

Nicolas Pooran Smashed 36 Runs In An Over : निकोलस पूरनने अफगाणिस्तानविरुद्धच्या त्याच्या शानदार अर्धशतकी खेळीदरम्यान अझमतुल्ला ओमरझाईच्या एका षटकात ३६धावा ठोकल्या. पहिल्या डावातील चौथ्या षटकात ही घटना घडली. अफगाणिस्तानच्या मध्यमगती गोलंदाजाने या षटकात नऊ चेंडू टाकले.

WI vs AFG : एकाच षटकात ३६ तर, पॉवरप्लेमध्ये ९८ धावा ठोकल्या, निकोलस पूरननं पाडला चौकार-षटकारांचा पाऊस
WI vs AFG : एकाच षटकात ३६ तर, पॉवरप्लेमध्ये ९८ धावा ठोकल्या, निकोलस पूरननं पाडला चौकार-षटकारांचा पाऊस (AP)

टी-20 विश्वचषक २०२४ च्या ४० व्या सामन्यात (१८ जून) वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानचा १०४ धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजचा हा सलग चौथा विजय ठरला. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीत धमाकेदार कामगिरी करत या स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळवला.

सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २१८ धावा केल्या आणि त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला १६.२ षटकांत ११४ धावांत गुंडाळले.

वेस्ट इंडिजच्या विजयात निकोलस पूरनने फलंदाजी आणि ओबेड मॅकॉयने गोलंदाजीत महत्त्वाचे योगदान दिले.

दरम्यान, आतापर्यंत या टी-20 विश्वचषकात कमी धावसंख्येचे थरारक सामने पाहायला मिळत होते, परंतु सेंट लुसिया येथे खेळल्या गेलेल्या गट टप्प्यातील शेवटच्या सामन्यात षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला.

निकोलस पूरनने एका षटकात ३६ धावा ठोकल्या

यजमान वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यातील या सामन्यात निकोलस पूरनने एका षटकात ३६ धावा ठोकल्या. वेगवान गोलंदाज अजमतुल्ला उमरझाईने षटकात नो आणि वाईडसह एकूण ९ चेंडू टाकले, ज्यामध्ये पूरनने धावा वसूल केल्या. षटकाच्या अखेरीस ३६ धावा झाल्या.

पॉवरप्लेच्या ६ षटकात ९२ धावा

या सामन्यात वेस्ट इंडिजने T20 विश्वचषकाच्या इतिहासातील पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा १ बाद ९२ करण्याचा विक्रमही केला.

६, ५NB, ५WD, ०, ४LB, ४, ६, ६

खरेतर, निकोलस पूरनने डावाच्या दुसऱ्या आणि चौथ्या षटकात अजमतुल्ला ओमरझाईविरुद्ध आपला खतरनाक फॉर्म दाखवला. षटक सुरू होण्यापूर्वी तो २ चेंडूंत १ धाव करून क्रीजवर होता, पण षटक संपेपर्यंत त्याची धावसंख्या ९ चेंडूंत २७ धावांवर पोहोचली. पहिल्याच चेंडूवर षटकार मारल्यानंतर ओमरझाईने पुढचा नो बॉल टाकला, ज्यावर चौकार आला.

फ्री हिटवर बाऊन्सर टाकण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चौकारावर गेला. फ्री हिट अजूनही शाबूत होता, त्यावर त्याने शानदार यॉर्कर मारून पूरनला क्लीन बोल्ड केले, पण त्याला विकेट मिळाली नागी. पुढच्या चेंडूवर त्याला लेग बाय ४ मिळाला आणि शेवटच्या ३ चेंडूंवर निकोलस पूरनने १ चौकार आणि नंतर सलग २ षटकार ठोकले.

एका षटकात ३६ धावा देणारे गोलंदाज (T20I)

स्टुअर्ट ब्रॉड VS युवराज सिंग, २००७

अकिला धनंजय VS किरॉन पोलार्ड, २०२१

करीम जन्नत VS रोहित शर्मा आणि रिंकू सिंग, २०२४

कामरान खान VS दीपेंद्र सिंग एयरी, २०२४

अजमतुल्ला ओमरझाई VS निकोलस पूरन, २०२४

Whats_app_banner